तालिबान भारताला म्हणतंय 'थँक्स', दोन्ही देशाच्या मैत्रीवर तालिबानी नेत्यांचं भाष्य

ही मदत शनिवारी नवी दिल्लीहून काबूलला विशेष विमानाने पाठवण्यात आली.
India sent life saving medicines, Taliban said thank you
India sent life saving medicines, Taliban said thank you Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताने अलीकडेच 1.6 मेट्रिक टन जीवनरक्षक औषधांची पहिली खेप अफगाणिस्तानला (Afghanistan) पाठवली आहे. त्याचवेळी, आता तालिबानने (Taliban) यासाठी भारताचे (India) आभार मानले असून दोन्ही देशांमधील संबंध अतिशय महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ही मदत शनिवारी नवी दिल्लीहून काबूलला विशेष विमानाने पाठवण्यात आली. त्यात जीवरक्षक औषधांचाही समावेश होता. अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे यांनी ट्विटरवर सांगितले की, ही मदत अनेक अफगाण कुटुंबांना या कठीण काळात मदत करेल.

फरीद मामुंदजे म्हणाले, “सर्व मुलांना थोडी मदत, थोडी आशा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. भारतातून वैद्यकीय मदतीची पहिली खेप काल सकाळी काबूलला पोहोचली. 1.6 मेट्रिक टन जीवनरक्षक औषधे या कठीण काळात अनेक कुटुंबांना मदत करतील. भारतातील लोकांकडून भेट.'' इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान (IEA) चे उप प्रवक्ते अहमदउल्ला वासिक यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, 'भारत या क्षेत्रात आघाडीवर असलेला देश आहे. अफगाणिस्तान-भारत संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत.

India sent life saving medicines, Taliban said thank you
चीनमध्ये ट्विटरवर बंदी?

परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, अफगाणिस्तानमधील आव्हानात्मक मानवतावादी परिस्थिती लक्षात घेता, भारत सरकारने परतीच्या फ्लाइटमध्ये वैद्यकीय साहित्याची खेप पाठवली आहे. या विमानाने अफगाणिस्तानातून बाहेर काढलेल्या भारतीयांना आणले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, विशेष विमानाने 10 भारतीय आणि 94 अफगाण लोकांना, ज्यात हिंदू-शीख अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांचा समावेश होता, त्यांना अफगाणिस्तानातून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत आणले गेले.

'ऑपरेशन देवी शक्ती' अंतर्गत अफगाणिस्तानातून आले 669 लोक

'ऑपरेशन देवी शक्ती' अंतर्गत आतापर्यंत एकूण 669 लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. यात अफगाण हिंदू/शीख अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांसह शेकडो भारतीय आणि अफगाण लोकांचा समावेश आहे. ऑगस्ट 2021 मध्ये, 438 भारतीयांसह 565 लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले. तालिबानच्या ताब्यात आल्यापासून मोठ्या संख्येने लोक अफगाणिस्तानातून पलायन करत होते. मात्र, तालिबान आता लोकांना देश सोडून जाऊ नये असे आवाहन करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com