तालिबानची अमेरिकेला तंबी !

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांनंतर, अमेरिकन सैन्याने 31 ऑगस्ट रोजी काबूल (Taliban) पूर्णपणे सोडले आहे.
Taliban warns USA not to operate drones over afghan airspace
Taliban warns USA not to operate drones over afghan airspaceDainik Gomantak
Published on
Updated on

तालिबानने (Taliban) मंगळवारी अमेरिकेला (USA) कडक स्वरात इशारा दिला आहे . स्पुतनिकच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने आपले ड्रोन (Drone) अफगाणिस्तानच्या (Afghanistan) हवाई हद्दीत (Afghan Air Space) ऑपरेट करू नयेत जेणेकरून त्याचे नकारात्मक परिणाम होणार नाहीत .अमेरिकेच्या या कारवायांना राष्ट्रीय सुरक्षेचा भंग असल्याचे सांगत तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी सर्व देशांना आणि वॉशिंग्टनला या प्रकरणात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.(Taliban warns USA not to operate drones over afghan airspace)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यापासून महिलांवरील निर्बंधांची व्याप्ती सातत्याने वाढताना दिसत आहे. याच नियमांचा भाग म्हणून काबूल विद्यापीठात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानने नियुक्त केलेल्या विद्यापीठाचे नवे कुलपती महंमद अशरफ गायरत यांनी सोमवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की विद्यापीठात विद्यार्थी किंवा शिक्षक म्हणून महिलांच्या प्रवेशावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे.

या अगोदरही ज्यावेळी तालिबानची अफगान्वर सत्ता होती त्यावेळसही तालिबानने असेच नियम लादले होते. त्या काळात त्यांच्या पहिल्या राजवटीत तालिबान्यांनी मुलींना शाळेतून पूर्णपणे काढून टाकले. महिलांना एकटेच घराबाहेर पडण्यास बंदी होती. त्याला फक्त पुरुष नातेवाईकासोबत सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी होती.तालिबानने काही दिवसांपूर्वी महिला व्यवहार मंत्रालय बंद केले आणि त्याच्या जागी नवीन मंत्रालय उघडले. नोकरी करणाऱ्या महिलांना घरीच राहण्यास सांगितले आहे. तालिबानने उत्तर अफगाणिस्तानातील पुल-ए-खुमरी शहरातील एकमेव महिला निवारा ताब्यात घेतला आहे. कौटुंबिक हिंसाचारामुळे निराश होऊन 20 महिलांनी येथे आश्रय घेतला होता.

Taliban warns USA not to operate drones over afghan airspace
'भारत-चीनशी मैत्री अत्यंत महत्त्वाची': नेपाळी परराष्ट्र मंत्री

गेल्या महिन्यात तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला. यानंतर देशात त्यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांनंतर, अमेरिकन सैन्याने 31 ऑगस्ट रोजी काबूल पूर्णपणे सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com