'भारत-चीनशी मैत्री अत्यंत महत्त्वाची': नेपाळी परराष्ट्र मंत्री

नेपाळचे प्रबुद्ध पुत्र भगवान बुद्धांच्या शिकवणींनी आम्ही प्रेरित असून शांततापूर्ण सह-अस्तित्वाची मनोकामनाही आम्ही करतो.
Narayan Khadka
Narayan KhadkaDainik Gomantak
Published on
Updated on

संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या महासभेला जगातील अनेक देशांचे प्रमुख संबोधित करत आहेत. यातच आता नेपाळचे (Nepal) नवे परराष्ट्र मंत्री नारायण खडका (Narayan Khadka) यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या महासभेत ( UNGA) सांगितले की, भारत (India) आणि चीन (China) यांच्याशी मैत्री 'परराष्ट्र धोरणासाठी सर्वात महत्वाची आहे'. महासभेच्या सर्वसाधारण चर्चेच्या शेवटच्या दिवशी सोमवारी खडका म्हणाले की, जगासाठी नेपाळचा दृष्टिकोन "सर्वांशी मैत्री आणि कोणत्याही देशाशी वैर नाही" या तत्त्वावर आधारित आहे.

ते पुढे म्हणाले की, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांच्या नेतृत्वाखालील सरकार "सार्वभौम समानता, परस्पर आदर आणि समान हितावर आधारित परराष्ट्र धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी वचनबद्ध असून व्यापक स्तरावर आंतरराष्ट्रीय समुदायातील सर्व मित्र देशांसोबत काम करेल". हे धोरण पंचशीलवर आधारित असून, नेपाळचे प्रबुद्ध पुत्र भगवान बुद्धांच्या शिकवणींनी आम्ही प्रेरित असून शांततापूर्ण सह-अस्तित्वाची मनोकामनाही आम्ही करतो.

22 सप्टेंबर रोजी खडका यांना नेपाळचे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी ब्लूप्रिंट म्हणून या तत्त्वांची प्रासंगिकता सध्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. "संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) सनदेची तत्त्वे आणि उद्दिष्टे, संरेखन, आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक शांततेचे मानक हे आमच्या परराष्ट्र धोरणाचा आधार आहेत." ते पुढे म्हणाले, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महासभेच्या सत्राच्या वेळी खडका यांची भेट घेतली होती. रविवारी येथे त्यांनी सांगितले की, आमचे विशेष संबंध पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र काम केले पाहिजे यावर आम्ही सहमत झालो आहोत.

Narayan Khadka
पाकिस्तानच दहशतवाद्यांची भूमी, अमेरिकेच्या सीआरएसचा मोठा खुलासा

'जगातील देश अनेक छोट्या छोट्या कारणांनी विभागले जात आहेत'

ते पुढे म्हणाले, "दहशतवादापासून ते हवामान बदल, अन्न सुरक्षा, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, राजकीय मूलतत्त्ववाद आणि अतिरेकीपणा ही जगातील सर्व देशांसमोरची आव्हाने आहेत." अनिश्चिततेच्या दरम्यान नवीन मार्गाने जीवन जगणे अत्यावश्यक बनले आहे. आपण जगाच्या वेगवेगळ्या भागात संघर्ष पाहत आहोत. हे देशांपेक्षा स्वतःचे अधिक अंतर्गत संघर्ष आहेत. त्याने स्वकेंद्रित राजकारणाला जास्त चालना दिली आहे. वंश, जात, लिंग आणि धर्माच्या आधारावर देशांची विभागणी वाढत आहे.

Narayan Khadka
अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये मोठा बदल; पदभार स्वीकारताच बायडन यांचा निर्णय

भारत आणि चीनचे आभार

त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सहिष्णुता आणि सौहार्दाने काम करण्याचे आणि या अकल्पनीय समस्यांना तोंड देण्यासाठी 'समान आधार' शोधण्याचे आवाहन केले (India China Nepal Conflict). जागतिक नेत्यांना संबोधित करताना खडका यांनी हिमालयी देशाला जागतिक कोरोना महामारीच्या विरूद्ध लढ्यात मदत केल्याबद्दल भारत आणि चीनचे आभार मानले आहे. ते पुढे म्हणाले की, 'कोविड संकटाचा सामना करण्यासाठी आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही आपले जवळचे असेलेले शेजारी भारत आणि चीन यांचे आभारी आहोत'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com