अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानचे राज्य स्थापन झाल्यानंतर पाकिस्तान या संघटनेला उघडपणे पाठिंबा देत आहे. दरम्यान पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफ (Tehreek-e-Insaf) आनंद साजरा करत आहे. दरम्यान, पीटीआयच्या एका नेत्याने काश्मीर (Kashmir Issue) प्रश्नाबाबत खळबळजनक दावा केला आहे. नीलम इर्शाद शेख म्हणाले की, तालिबान पाकिस्तानसोबत (Pakistan) आहे. तालिबान (Taliban) येऊन काश्मीर जिंकून पाकिस्तानला देईल.
इम्रान खान यांच्या पार्टी तहरीक-ए-इन्साफच्या (Tehreek-e-Insaf) सदस्या नीलम इर्शाद शेख (Neelam Irshad Sheikhh) यांनी पाकिस्तानच्या 'बोल टीव्ही' वरील चर्चेत हे वादग्रस्त विधान केले आहे. तालिबानचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जवळचे संबंध असल्याचे मानले जात आहे.
नीलम पुढे म्हणाले, 'इम्रान सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानचा अभिमान वाढला आहे. तालिबान आमच्या सोबत आहे आणि इंशा अल्लाह आम्हाला काश्मीर जिंकून देण्यासाठी मदत करतील. जेव्हा त्यांना टिव्ही अँकरने विचारले तुम्हाला तालिबान काश्मीर जिंकून कसा देणार, यावर नीलम म्हणाल्या, 'भारताने आपले तुकडे केले आहेत आणि आम्ही तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहोत. आपल्या सैन्याकडे सत्ता आहे, त्याचबरोबर सरकारकडेही शक्ती आहे. तालिबान आम्हाला पाठिंबा देत आहे कारण त्यांच्यावर अत्याचार होत असताना पाकिस्तानने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता तो आम्हाला साथ देईल.
नीलम यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांना उघडपणे मदत केल्याचा आरोप होत आहे. अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान पाकिस्तानच्या आदिवासी भागातून हजारो दहशतवादी अफगाणिस्तानात गेले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट आली आहे.
इम्रान खान यांनी तालिबानला एक सामान्य नागरिक संबोधले
याआधी इम्रान खान यांनीही तालिबानी लढाऊंना सामान्य नागरिक म्हणून संबोधले होते. ते म्हणाले होते, 'अफगाणिस्तानमध्ये रक्ताची होळी खेळणारे तालिबान दहशतवादी नाहीत, ते सामान्य नागरिक आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानात सर्वकाही उद्ध्वस्त केले. ' ते म्हणाले की यातील बहुतेक निर्वासित पश्तून आहेत. हा तोच वांशिक गट आहे जो अफगाणिस्तानमध्ये लढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.