तालिबानने बैलिस्टिक मिसाईलची केली चाचणी; पाकिस्तानी पत्रकाराचा दावा

अफगाणिस्तानी लोक जीव वाचवण्यासाठी राजधानी काबूलच्या (Kabul) दिशेने धाव घेत आहेत.
Taliban Tests Long Range Missile
Taliban Tests Long Range MissileDainik Gomantak

Taliban Tests Long Range Missile: तालिबानने (Taliban) लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. विदेशी देशातील सैन्यांकडून आधुनिक प्रशिक्षण घेऊन देखील तालिबानसमोर अफगाणिस्तान (Afghanistan) सेना कमजोर पडत आहे. तालिबानचा दावा केला की,देशातील 85 टक्के भागावर आम्ही कब्जा केला आहे. अफगाणिस्तानी लोक जीव वाचवण्यासाठी राजधानी काबूलच्या (Kabul) दिशेने धाव घेत आहेत. मात्र तालिबानची नजर काबूलवरही आहे. दरम्यान पाकिस्तानचे पत्रकार मोहिबुल्लाह खान (Mohibullah Khan) यांनी दावा केला की, तालिबानने लांब पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी केली आहे. यासंबंधीचा व्हिडिओही शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मिसाईलचे परिक्षण केले असल्याचे दिसत आहे. त्यातच मोहिबुल्लाह खानने सोशल मिडियावर ट्विट केलेल्या कॅप्शनमध्ये मिसाईलचे नावही सांगितले आहे. ‘तालिबानने सफलतापूर्वक दीर्घ मारा करणारे बैलिस्टिक मिसाइल 'अल-फतह' (Al-Fatah) ची चाचणी केली आहे.’ या मिसाईलचे नाव 'अल-फतह' सांगितले आहे. (तालिबान आर्मी शस्त्रे). तथापि याविषयी अधिक माहिती दिली गेलेली नाही. तर तालिबानकडे हे मिसाइल कशापध्दतीने पोहोचले आणि ते पोहोचविण्यासाठी कोणत्या देशाने मदत केली हे अद्याप समजलेले नाही. मात्र तालिबाने सफलतापूर्वक मिसाइलचे परिक्षण करणे हे अफगाणिस्तान सरकारच्या अडचणीत अधिक वाढ करणारे ठरणार आहे.

Taliban Tests Long Range Missile
Afghanistan: राष्ट्रपती भवनावर रॉकेट हल्ला

मिसाईल-रॉकेट का सहारा ले रहा तलिबान

तालिबान जगभरात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आधुनिक शस्त्रासंह आता क्षेपणास्त्रांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तान अध्यक्षांच्या निवासस्थाना शेजारी रॉकेटद्वारे हल्ला केला होता. मंगळवारी तीन रॉकेट या ठिकाणी डागली होती. दरम्यान राष्ट्राध्यक्ष बकरी ईदच्या मुहुर्तावर नमाज पठण करत होते. आंतरिक मंत्र्याच्या प्रवक्त्यांनी यासंबंधी सांगितले की, यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. आणि रॉकेट निवासस्थानाच्या शेजारी येऊन पडले. तालिबानने माध्यमांशी बोलताना या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

Taliban Tests Long Range Missile
अफगाणिस्तान होणार दुसरे 'सौदी अरेबिया'; देशात खनिजांचा प्रचंड साठा

पाकिस्तान तालिबान संघटनेला मदत करतोय

या संपूर्ण प्रकरणात अफगाणिस्तानचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींपासून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंपतच्या सर्वजण पाकिस्तान तालिबान मदत करत असल्याचा आरोप केला करत आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहा हजारापेक्षा जास्त जिहादी युवक अफगानिस्तानमध्ये घुसले आहेत. (पाकिस्तान तालिबानला मदत करते). त्यांनी पाकिस्तानच्या पीएम इमरान खान खाजगीपणाच्या आंतरराष्ट्रीय सम्मेलन संबंधी आंतरराष्ट्रीय संमेलनाला संबोधित करताना म्हटले की, पाकिस्तान तालिबान संघटनेला पूर्णपणे मदत करत आहे. अमरुल्लाह सालेह यांनी म्हटले की, पाकिस्तान की वायु सेनेने अफगाणिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना धमकी दिली की, स्पिन बोल्डक मधून तालिबाने हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान प्रतियुत्तर म्हणून हल्ला करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com