तालिबान सरकारचा आज होणारा शपथविधी रद्द

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सरकारची घोषणा करणाऱ्या तालिबानने (Taliban Government) आज होणार शपथविधी सोहळा रद्द केला आहे
Taliban Government cancel todays Swearing-in ceremony
Taliban Government cancel todays Swearing-in ceremonyDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सरकारची घोषणा करणाऱ्या तालिबानने (Taliban Government) आज होणार शपथविधी सोहळा रद्द केला आहे (Swearing-in ceremony). रशियाच्या टीएसएस वृत्तसंस्थेने शुक्रवारी ही माहिती दिली असून तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामूल्ला सामंगानी (Innamullah Samangani ) म्हणाले की देशाच्या अंतरिम सरकारला चिन्हांकित करणारा उद्घाटन सोहळा आणि शपथविधी रद्द करण्यात आला आहे.(Taliban Government cancel todays Swearing-in ceremony)

"नवीन अफगाणिस्तान सरकारचा उद्घाटन सोहळा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आला. लोकांना आणखी गोंधळात टाकू नये म्हणून इस्लामिक अमीरात (तालिबान) च्या नेतृत्वाने मंत्रिमंडळाची घोषणा केली आणि त्याने आधीच कामकाज सुरू केले आहे. ”असे ट्विट करत इनामूल्ला सामंगानी ही माहिती दिली आहे.

Taliban Government cancel todays Swearing-in ceremony
तालिबान सरकारला मान्यता देण्यास घाई नाही: व्हाईट हाऊस

एवढेच नाही तर सामंगणीने सरकारच्या शपथविधी सोहळ्याला 11 सप्टेंबर रोजी निश्चित केल्याच्या वृत्तालाही अफवा असल्याचे म्हटले आहे. खरंच, यापूर्वी असे वृत्त आले होते की 11 सप्टेंबर रोजी तालिबानचे नवे सरकार शपथ घेऊ शकते. हा दिवस म्हणजे अमेरिकेत 9/11 (nineten21) च्या हल्ल्याचा 20 वा वर्धापन दिन आहे. उल्लेखनीय म्हणजे, 15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. काही दिवसांनी तालिबानने दावा केला की त्याने पंजशीर खोरेही काबीज केले आहे. यानंतर, 7 सप्टेंबर रोजी तालिबानने अंतरिम सरकारची घोषणा केली होती.

7 सप्टेंबर रोजी तालिबानने अफगाणिस्तानच्या काळजीवाहू सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आणि मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी काबूलमध्ये माहिती देताना सांगितले की, "नवीन इस्लामिक सरकार" मध्ये, 'रहबारी शूरा' या संघटनेच्या शक्तिशाली निर्णय घेणाऱ्या संस्थेचे प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे पंतप्रधान असतील तर मुल्ला अब्दुल गनी बरदार उपपंतप्रधान असतील.

याशिवाय, सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री, मुल्ला अमीर खान मुतकीला परराष्ट्र मंत्री, शेर मोहम्मद अब्बास तस्तिकझाईला उप परराष्ट्र मंत्री, मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री, मुल्ला हिदायतुल्ला बद्रीला अर्थमंत्री आणि कारी फसिहुद्दीन बदखशानीला लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com