चीनने (China) गुरुवारी उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतातील (China’s Shanxi Province) तियानहुई II-02 उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून तियानहुई II-02 उपग्रह यशस्वीरित्या (Tianhui II-02 satellites) कक्षेत पाठवला. शांघाय अकॅडमी ऑफ स्पेस फ्लाइट टेक्नॉलॉजी (SAST) ने विकसित केलेला उपग्रह लाँग मार्च -4 बी कॅरियर रॉकेटद्वारे (March-4B carrier rocket) सकाळी 6:32 वाजता प्रक्षेपित करण्यात आला आणि याचा उपयोग प्रामुख्याने वैज्ञानिक प्रयोग संशोधन, भूमी, संसाधन आणि भौगोलिक सर्वेक्षणासाठी करण्यात येणार आहे.
त्याच वेळी, उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वाहक रॉकेट SAST ने विकसित केले आहे. हे सामान्य तापमानावर द्रव इंधनावर चालवले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन टप्प्यांचे (three-stage rocket) रॉकेट चालवता येते. हे रॉकेट वेगवेगळ्या प्रकारच्या उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षांमध्ये प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. या वर्षी लॉंग मार्च -4 बी कॅरियर रॉकेट मालिकेचे हे 9 वे मिशन आहे आणि लॉंग मार्च मालिकेचे 384 वे फ्लाइट मिशन आहे.
नेमकं रॉकेट आहे तरी काय
रॉकेट हे एक यान आहे, ज्याच्या मदतीने उपग्रह आणि विविध उपकरणे अवकाशात पाठवली जातात. रॉकेट न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाच्या तत्त्वावर कार्य करते. रॉकेटचा इतिहास 13 व्या शतकातातील आहे. याचा शोध प्रथम चीनमध्ये लागला.
रॉकेट कसे कार्य करते
वास्तविक, जेव्हा रॉकेटमध्ये इंधनाचा वापर केला जाते, तेव्हा त्यातून वायू बाहेर येतो. ज्याच्या परिणामस्वरूप रॉकेटच्या विरुद्ध एक ऊर्ध्वगामी शक्ती लागू केली जाते, ज्यामुळे रॉकेट वरच्या दिशेने उडण्यास सुरवात करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.