गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अराजकतेचा सामना तेथील नागरिकांसंह संपूर्ण जग करत आहे. त्यातच आता अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांना काबूलमधील अराजकतेसाठी जबाबदार धरत तालिबानने (Taliban) म्हटले की, अशरफ घनी यांनी आपल्यासोबत जे काही घेऊन गेले होते ते, अफगाणिस्तानला परत करावे लागेल. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन (Suhail Shaheen) यांनी म्हटले की, 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर काबूलमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेसाठी केवळ अशरफ घनीच जबाबदार आहेत. ते पुढे म्हणाले, माजी राष्ट्रपतींनी अचानक सरकारमधून बाहेर पडून चूक केली. तालिबानला काबुलमध्ये शांततेने सत्ता हस्तांतरित करायची होती. आमचे लढाऊ सैन्य काबूलच्या गेटवरही येऊन थांबले होते. परंतु, अशरफ घनी अचानक पळून गेले. त्यांनी देश सोडून चूक केली. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले. आणि अखेर गोळीबाराच्या घटना घडल्या.
दोहा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, अशरफ घनी मोठ्याप्रमाणात पैसे घेऊन पळून गेल्याच्या वृत्तावर सुहेल शाहीन म्हणाले की, त्यांनी जे काही घेऊन गेले आहे, ते त्यांच्या मालकीचे नाही त्यामुळे त्यांनी देशाला ते परत करावे लागेल. तथापि, प्रवक्त्याने पुढे सांगितले की, तालिबानला अशरफ घनींचा पाठपुरावा करण्यामध्ये काहीही स्वारस्य नाही. कारण तालिबानचे पूर्ण लक्ष आता काबूलमध्ये नवीन सरकार स्थापनेवर आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्रपती अशरफ घनी पैसे घेऊन काबूलमधून पळून गेल्याच्या वृत्ताचे त्यांनी यावेळी मात्र खंडन केले आहे.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी काबूल सोडण्याच्या निर्णयाचा बचाव करत म्हटले होते की, रक्तपात थांबवण्याचा हा एकमेव मार्ग होता. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या राजदूताचे दावेही त्यांनी फेटाळले की, त्यांनी देशाच्या कोषागारातून लाखो डॉलर्स घेऊन गेले ते. घनींनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यात ते संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये असल्याची पुष्टी होते. त्यांनी आपल्या संदेशात अफगाण सुरक्षा दलांचे आभार मानले, परंतु तालिबानने "शांतता प्रक्रियेच्या अपयशामुळे" सत्ता आपल्याकडून हिरावून घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.