
बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) संघटनेनं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सुरक्षेसमोर गंभीर आव्हान उभं केलं आहे. संस्थेने दक्षिण वझिरिस्तानच्या बद्र भागात पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये टीटीपीच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या छावणीवर हल्ला केल्याचं दृश्य पाहायला मिळतयं. ४० जवान ठार किंवा जखमी झाल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष फुटेजमध्ये सुमारे ३० ते ३५ जवानांवर गोळीबार होताना पाहायला मिळत आहे. तरीही, या हल्ल्यामुळे पाक सैन्याच्या कार्यपद्धतीवर आणि सुरक्षा यंत्रणांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)ने प्रसिद्ध केलेल्या नव्या व्हिडिओमुळे पाकिस्तानी सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या व्हिडिओमध्ये दहशतवादी विविध दिशांनी गोळीबार करताना दिसत आहेत.
मात्र, ते नेमक्या कोणत्या बाजूने हल्ला चढवत होते हे पाकिस्तानी सैन्य ओळखण्यात अपयशी ठरले. या गोंधळामुळे जवानांना हल्ल्यादरम्यान त्वरित आणि प्रतिउत्तर देणे कठीण गेले.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि वझिरिस्तान या भागांमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पाकिस्तानी सरकार आणि सैन्याने दहशतवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या असूनही तालिबानचे हल्ले सुरूच आहेत. दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण न मिळाल्यास आगामी काळात पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आणखी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण न मिळाल्यास आगामी काळात पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आणखी मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तालिबानचा प्रभाव वाढत असताना, सैन्याची गुप्तचर माहिती आणि प्रत्युत्तर क्षमता याबाबतही गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.