आइसलँडमध्ये 'महिला राज', इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 33 खासदार

पंतप्रधानकैटरीन जेकब्सडाटिर (Katrín Jakobsdóttir) यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या तीन पक्षांनी एकत्र येत शनिवारच्या मतदानामध्ये एकूण 37 जागा जिंकल्या.
Women's Power in Iceland  Katrín Jakobsdóttir is new Prime Minister with 33 Women's MP
Women's Power in Iceland Katrín Jakobsdóttir is new Prime Minister with 33 Women's MP Dainik Gomantak
Published on
Updated on

आइसलँडने (Iceland) बहुसंख्य महिलांसह युरोपची पहिली सांसद (European Parliament) निवडली आहे. उत्तर अटलांटिकच्या बेट राष्ट्रात पुरूष आणि स्त्री समानतेचा हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे . रविवारी मतमोजणी संपली तेव्हा आइसलँडच्या 63 सदस्यीय संसदेतील अलथिंगमध्ये (Althingi Parliament House) महिला उमेदवारांनी 33 जागा जिंकत इतिहास रचला आहे. पंतप्रधानकैटरीन जेकब्सडाटिर (Katrín Jakobsdóttir) यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या तीन पक्षांनी एकत्र येत शनिवारच्या मतदानामध्ये एकूण 37 जागा जिंकल्या. युतीला गेल्या निवडणुकीपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत आणि तोच पक्ष सत्तेत राहण्याची शक्यता आहे.(Women's Power in Iceland Katrín Jakobsdóttir is new Prime Minister with 33 Women's MP)

राजकारणाचे प्राध्यापक सिल्जा बारा ओमर्सडिटिर म्हणाले की, गेल्या दशकात डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी लागू केलेल्या समानतेचा कायदा आइसलँडच्या राजकारणात एक नवीन मापदंड स्थापित करण्यात यशस्वी झाला आहे. उमेदवार निवडताना लिंग समानतेकडे दुर्लक्ष करणे आता स्वीकार्य नाही, असे ते म्हणाले.

Women's Power in Iceland  Katrín Jakobsdóttir is new Prime Minister with 33 Women's MP
तालिबानचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानचा पासपोर्ट आणि ओळखपत्र बदलणार

ओपिनियन पोलने डाव्यांच्या विजयाचे संकेत दिले असून 10 पक्ष जागांसाठी लढत आहेत. पण, मध्य उजव्या विचारसरणीच्या स्वातंत्र्य पक्षाने सर्वाधिक मते मिळवत 16 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी सात महिला आहेत. सेंट्रिस्ट प्रोग्रेसिव्ह पार्टीने सर्वात मोठी आघाडी घेतली आणि 13 जागा जिंकण्यात यश मिळवले. पुरोगामी पक्षाला गेल्या वेळेपेक्षा पाच जागा अधिक मिळाल्या आहेत.

निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी जेकब्सडेटायरच्या डाव्या विचारसरणीच्या ग्रीन पार्टीसोबत युतीचे सरकार स्थापन केले. जॅकोब्स्ड्टीरच्या पक्षाने अनेक जागा गमावल्या, परंतु निवडणुकीच्या अंदाजाला नकार देत आठ जागा कायम ठेवल्या. तीन सत्ताधारी पक्षांनी दुसऱ्या टर्मसाठी एकत्र काम करणार की नाही हे जाहीर केलेले नाही, परंतु मतदारांचा भक्कम पाठिंबा दिल्याने ते एकत्र येण्याची शक्यता आहे. नवीन सरकारच्या स्थापनेबाबत परिस्थिती स्पष्ट होण्यास आणखी काही वेळ लागू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com