NATO Membership: नाटोमध्ये सामील होण्याचा स्वीडनचा सर्वात मोठा अडथळा दूर; 'या' देशाने दिला अखेर पाठिंबा

Sweden–Türkiye Relations: तुर्कीच्या संसदेने मंगळवारी स्वीडनच्या नाटो सदस्यत्वाच्या दाव्याला मान्यता दिली.
Turkey parliament
Turkey parliamentDainik Gomantak
Published on
Updated on

Sweden–Türkiye Relations: तुर्कीच्या संसदेने मंगळवारी स्वीडनच्या नाटो सदस्यत्वाच्या दाव्याला मान्यता दिली. त्यामुळे आता पाश्चात्य लष्करी आघाडीच्या विस्तारातील स्वीडनचा सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तुर्कीच्या महासभेत अर्जाच्या बाजूने 287 मते पडली तर 55 मते विरोधात पडली. स्वीडनने 2022 मध्ये पहिल्यांदा हा अर्ज केला होता. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून स्वीडनने आपली सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले होते. तुर्कीच्या महासभेत अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या सत्ताधारी आघाडीला बहुमत आहे.

स्वीडनने 2022 मध्ये अर्ज केला होता

दरम्यान, सर्व NATO सदस्यांना युतीमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या देशांचे अर्ज मंजूर करावे लागतील. स्वीडन आणि फिनलंडने 2022 मध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुर्कीने आक्षेप घेतला होता. तुर्कीने असा युक्तिवाद केला होता की, हे दोन्ही देश ज्या गटांना दहशतवादी मानतात त्यांना संरक्षण देत आहेत. तुर्कीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फिनलंडच्या सदस्यत्वाचे समर्थन केले होते, परंतु हंगेरीसह स्वीडनलाही वेटिंगमध्ये ठेवले होते.

Turkey parliament
Russia Ukraine War: युक्रेन काय मागं सरकत नाही... रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; NATO कडे संशयाची सुई

तुर्कीच्या हालचालीवर फिनलंडने काय म्हटले?

अमेरिकेचे राजदूत जेफ फ्लेक यांनी मंगळवारी एका लेखी निवेदनात म्हटले आहे की, "नाटोमध्ये स्वीडनच्या प्रवेशास मान्यता देण्याच्या तुर्की संसदेच्या आजच्या निर्णयाचे मी कौतुक करतो." ते पुढे म्हणाले की, तुर्कीची 'नाटो युतीसाठीची वचनबद्धता आमची चिरस्थायी भागीदारी स्पष्टपणे दर्शवते.' स्वीडनचे परराष्ट्र मंत्री टोबियास बिलस्ट्रॉम यांनीही तुर्कीच्या संसदेच्या मंजुरीचे स्वागत केले. बिलस्ट्रॉम यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आता राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या समर्थनाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्याची वाट पाहत आहोत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com