Protest
ProtestDainik Gomantak

Nepal Gen Z Protest: नेपाळ देशात आता लष्कराची हुकूमत; फ्रान्समध्येही सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष, पोलिस बळाचा वापर

France demonstrations: नेपाळमध्ये दोन दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर तणावपूर्ण वातावरण होते. देशाचे पंतप्रधान आणि अध्यक्षांनी राजीनामा दिलाय.
Published on

काठमांडू: नेपाळमध्ये दोन दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर तणावपूर्ण वातावरण होते. देशाचे पंतप्रधान आणि अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी (ता. ९) रात्रीपासूनच सैन्यदलाने अंतर्गत सुरक्षा आपल्या हाती घेत देशभर निर्बंध लागू केल्यामुळे आज कोठेही निदर्शने झाली नाहीत. सैन्याने आज संध्याकाळनंतर देशभर संचारबंदी लागू करत आंदोलन पुन्हा न भडकण्याची खबरदारी घेतली.

समाज माध्यमांवरील बंदीच्या निषेधार्थ निदर्शने करत नेपाळमधील युवकांनी सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सरकारविरोधात प्रचंड मोठे आंदोलन करत सरकारी इमारतींवर हल्ले केले होते.

Protest
Goa: दिवाडीत ‘कोटीतीर्थ कॉरिडॉर’! एक हजार मंदिरांचे प्रातिनिधिक स्मारक; संग्रहालयही उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

संसदेसह मंत्र्यांची व नेत्यांची घरेही त्यांनी जाळली. अराजकतेची ही स्थिती हाताबाहेर गेल्याने देशाचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले आहे.

Protest
Goa News: पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान महाविद्यालयाच्या डीन नियुक्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नेपाळमधील सरकारविरोधी असंतोषानंतर आता फ्रान्समधील सत्ताधाऱ्यांविरोधात रोष वाढत असल्याचे चित्र आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याविरोधात आंदोलकांनी बुधवारी (ता. १०) पॅरिससह देशव्यापी आंदोलन केले. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवले, आगी लावल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.

दिवसभरात काय घडलं?

प्रमुख शहरांमध्ये सैनिक तैनात

काठमांडूसह प्रमुख शहरांत शुकशुकाट

दिल्लीत नेपाळ दूतावासाबाहेरील सुरक्षा वाढविली

संघर्षातील मृतांची संख्या २५ वर

जाळपोळ करणाऱ्या २७ जणांना अटक, शस्त्रे जप्त

नेपाळमधील स्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांकडून चिंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com