Cough syrup मुळे कॅमेरूनमध्ये 12 मुलांचा मृत्यू; वाचा, या प्रकरणाचा भारताशी काय संबंध?

कॅमेरोनियन अधिकारी अद्याप या प्रकरणाचा शोध घेत आहेत आणि मृत्यूशी संबंधित नॅचरकोल्ड नमुने तपासण्याची योजना आखत आहेत.
Cough Syrup
Cough SyrupDainik Gomantak
Published on
Updated on

अलिकडच्या काही महिन्यांत मध्य आफ्रिकन देशात डझनभर मुलांचा कफ सिरपमुळे मृत्यू झाला होता. मुलांचा मृत्यू ज्या सिरपमुळे झाला ते सिरप भारतात बनवले असल्याचा दावा कॅमेरोनियन अधिकार्‍यांनी केला आहे.

Naturcold औषधाच्या बॉक्सच्या छायाचित्रांवर Riemann Labs Pvt. चा उत्पादनाचा परवाना क्रमांक दिसत आहे. ही कंपनी मध्य प्रदेश राज्यातील इंदूर येथे स्थित आहे. मात्र मकॅमेरूनमधील प्रादेशिक आरोग्य अधिकारी इको इको फिल्बर्ट यांनी जाहिर केलेल्या छायाचित्रांमध्ये औषध निर्मात्याचे नाव दिसत नाही.

फोटोमधील औषधे “आमच्यासारखीच दिसतात,” असे रीमनचे संचालक नवीन भाटिया यांनी एका फोन मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले की रीमन कठोरपणे गुणवत्ता नियंत्रणे पाळते आणि त्यामुळे आमच्याकडून असे औषध निर्मित होणे अशक्य आहे.

या खुलाशामुळे एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, निर्यात केलेल्या भारतीय कफ सिरपशी संबंधित आौषधांमुळे सामूहिक मृत्यू होण्याची तिसरी वेळ आहे. दोन अन्य भारतीय कंपन्यांच्या औषधांमुळे गेल्या वर्षी गाम्बियामध्ये 60 हून अधिक आणि उझबेकिस्तानमध्ये सुमारे 20 मुलांचा मृत्यू झाला होता.

Cough Syrup
Watch Video : 'कुत्ते की तरह भौंक'! गळ्यात पट्टा बांधून भूंकायला लावले; धक्कादायक प्रकाराने मध्य प्रदेश हादरले

त्या प्रकरणांमध्ये, सिरपची औषधे इथिलीन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन विषारी रसायनांनी दूषित असल्याचे आढळून आले. आणखी दोन भारतीय कंपन्यांनी लायबेरिया आणि मार्शल आयलंडमध्ये असेच दूषित सिरप बनवल्याचा संशय आहे.

फोटोंमध्ये दिसणार्‍या उत्पादनाच्या लेबलनुसार, कफ सिरपची बाटली मार्च २०२२ मध्ये बनवण्यात आली होती. त्यावर फ्रॅकन इंटरनॅशनल या यूकेचा पत्ता असलेली मार्केटिंग कंपनीचे नाव आणि लोगो आहे.

भाटिया म्हणाले की रीमनने 2022 च्या सुरुवातीला फ्रॅकनसाठी करारानुसार नॅचरकोल्डची बॅच तयार केली आणि ती कॅमेरूनला पाठवल्याचा अहवाल देणार्‍या निर्यातदाराला प्रदान केला. रिमन हे उत्पादन बनवणाऱ्या अनेक भारतीय कंपन्यांपैकी एक आहे, असे ते म्हणाले.

Cough Syrup
Mahanand Naik Goa: 16 महिलांची हत्या करणारा ‘दुपट्टा किलर’, गोव्यातला Serial Killer जो एका कॉलमुळे जाळ्यात अडकला

प्रोपीलीन ग्लायकोल आणि ग्लिसरीन हे सिरपसाठी प्रमुख कच्चा माल आहेत. भाटिया म्हणाले की, रीमन ही रसायने केवळ ब्रँडेड उत्पादकांकडून सीलबंद कंटेनरमध्ये खरेदी करते. आणि वापरण्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यासाठी तृतीय-पक्ष प्रयोगशाळेला नियुक्त करते. “आम्ही गुणवत्तेकडे जास्त लक्ष देतो,” असे भाटीया म्हणाले.

कॅमरूनमध्ये हा प्रकार समोर आल्याने मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाची एक टीम रिमनच्या तपासणीसाठी पाठवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com