ईशनिंदा प्रकरणात एका विद्यार्थ्याला मृत्यूदंडाची, तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा; प्रेषित मोहम्मद यांचा व्हिडिओ बनवणं पडलं महागात

Student Sentenced To Death In Pakistan For Blasphemy: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात न्यायालयाने एका 22 वर्षीय विद्यार्थ्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
Court
CourtDainik Gomantak

Student Sentenced To Death In Pakistan For Blasphemy: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात न्यायालयाने एका 22 वर्षीय विद्यार्थ्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे, तर दुसऱ्याला ईशनिंदा प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रेषित मुहम्मद आणि त्यांच्या पत्नींबद्दल अपमानास्पद शब्द बोलणे, फोटो आणि व्हिडिओ बनवल्याचा आरोप आरोपींवर आहे. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे वय 22 वर्षे आहे, तर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे वय 17 वर्षे आहे. म्हणजे तो किशोरवयीन आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर 'मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने' निंदनीय सामग्री शेअर केली होती. दरम्यान, दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी एफआयआर 2022 मध्ये नोंदवण्यात आला होता.

Court
Pakistan Rain Snowfall: पाकिस्तानात पावसाने केला कहर, 22 मुलांसह 35 जणांचा मृत्यू; अनेक भागात पूरस्थिती

दरम्यान, लाहोरमध्ये पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एफआयए) सायबर क्राइम युनिटने दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराने आरोप केला होता की, त्याला तीन वेगवेगळ्या मोबाईल फोन नंबरवरुन निंदनीय सामग्री असलेले व्हिडिओ आणि फोटो मिळाले होते. तपास यंत्रणेने तक्रारदाराच्या फोनची तपासणी केल्यानंतर आरोपीच्या फोनवरुन अश्लील साहित्य पाठवण्यात आल्याचे आढळून आले.

Court
Pakistan PM Oath: शाहबाज शरीफ यांनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; सरकारसमोर असणार 'ही' आव्हाने

दुसरीकडे, 22 वर्षीय विद्यार्थ्याचे वडील कनिष्ठ न्यायालयाने आपल्या मुलाला सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात लाहोर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानमध्ये ईशनिंदेची शिक्षा मृत्युदंड आहे. अविभाजित भारतात ब्रिटीशांच्या काळात ईशनिंद विरोधी कायदा पहिल्यांदा लागू करण्यात आला. नंतर 1980 च्या दशकात पाकिस्तानच्या लष्करी सरकारच्या अंतर्गत त्याचा विस्तार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com