अमेरिका (America) आणि कॅनडातील (Canada) अनेक राज्यांमध्ये हिपॅटायटीस ए चा उद्रेक समोर आला आहे. आतापर्यंत अमेरिकेत 17 आणि कॅनडात 10 जणांना हा आजार झाला आहे. दरम्यान, यूएस आणि कॅनडाच्या अन्न सुरक्षा नियामकाने सांगितले आहे की हा आजार दूषित सेंद्रिय स्ट्रॉबेरी खाल्ल्याने उद्भवत आहे. (Strawberries banned as hepatitis A virus spreads in US and Canada)
यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने ग्राहकांना सेंद्रिय स्ट्रॉबेरी न खाण्याचे आवाहन केले आहे. एफडीएने असा विश्वास वर्तवला आहे की सेंद्रिय स्ट्रॉबेरी हे यूएस आणि कॅनडाच्या अनेक राज्यांमध्ये पसरणाऱ्या हिपॅटायटीस ए संसर्गाचे कारण असू शकतात.
यूएस, कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत,
जेनिफर हसनने 'द वॉशिंग्टन पोस्ट'मधील एफडीएच्या हवाल्याने सांगितले आहे की, या आजाराची किमान 17 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 15 कॅलिफोर्नियामध्ये आढळली आहेत. या आजाराची अत्यंत संसर्गजन्य विषाणूची लागण झालेल्या किमान 12 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यांना ताप, मळमळ, ओटीपोटात दुखणे आणि थकवा जाणवत असल्याची तक्रार समोर आली आहे.
ग्राहक, रेस्टॉरंट आणि किरकोळ विक्रेत्यांना दिला सल्ला
FDA ने शनिवारी प्रकाशित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "ग्राहक, रेस्टॉरंट आणि किरकोळ विक्रेत्यांना 5 मार्च 2022 ते 25 एप्रिल 2022 दरम्यान फ्रेशकॅम्पो किंवा HEB सारख्या ब्रँडमधून खरेदी केलेल्या ताज्या सेंद्रिय स्ट्रॉबेरीची खरेदी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे." विक्री, सर्व्ह किंवा खाण्यात आणू नये.
FDA ने सांगितले की संभाव्य दूषित सेंद्रिय स्ट्रॉबेरी किमान नऊ लोकप्रिय किराणा दुकाणात देशभरात विकल्या गेल्या आहेत, ज्यात Aldi, Safeway, Trader Joe's आणि Walmart यांचा देखील समावेश आहे. निवेदनात पुढे म्हटले की स्ट्रॉबेरी या आजाराच्या उद्रेकाचे संभाव्य कारण आहेत."
हिपॅटायटीस ए कसा होतो?
हिपॅटायटीस ए हा सहसा दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनाने प्रसारित होतो, तो एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो. FDA ने सांगितले की संक्रमित स्ट्रॉबेरीची तपासणी चालू आहे आणि सल्ल्यानुसार इतर उत्पादनांचा देखील समावेश त्यामध्ये केला जाऊ शकतो.
अमेरिकेत हिपॅटायटीस ए चा प्रादुर्भाव होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 2016 मध्ये, किमान 37 यूएस राज्यांमध्ये हिपॅटायटीस ए ची 44,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली होती, आणि त्यामुळे किमान 420 मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहेत. पूर्वी झालेला उद्रेक कच्च्या स्कॅलॉप्ससारख्या उत्पादनांमुळे झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.