निवृत्तीनंतरचे आयुष्य जगा निवांत; LICच्या 'या' पोलिसीतून मिळवा पेन्शन

निवृत्तीनंतर आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय जगायचे असेल, तर एलआयसीच्या जीवन सरल पेन्शन (LIC Policy) योजनेत गुंतवणूक करू शकता.
LIC Policy, LIC monthly pension plan, LIC Jeevan Saral Pension Policy, LIC Pension plan information
LIC Policy, LIC monthly pension plan, LIC Jeevan Saral Pension Policy, LIC Pension plan information Dainik Gomantak
Published on
Updated on

निवृत्तीनंतरचे आयुष्य व्यक्तीकडे किती भांडवल जमा आहे, यावर अवलंबून असते. प्रत्येक समजूतदार माणूस नोकरीला लागताच निवृत्तीसाठी थोडीफार गुंतवणूक करू लागतो. निवृत्तीनंतर आरामात आणि कोणत्याही त्रासाशिवाय जगायचे असेल, तर एलआयसीच्या जीवन सरल पेन्शन (LIC Policy) योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला वयाच्या 60 नंतर निश्चित पेन्शन मिळते. (Get pension from LICs jeevan saral pension policy)

LIC Policy, LIC monthly pension plan, LIC Jeevan Saral Pension Policy, LIC Pension plan information
...म्हणून Aishwarya-Aamir ने कधीच केले नाही चित्रपटात एकत्र काम?

एलआयसी सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर 12 हजार रुपये पेन्शनची सुविधा मिळते. तुम्हाला किती पेन्शन मिळेल, ते तुम्ही एकरकमी किती पैसे गुंतवता यावर अवलंबून आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा, तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभरात पेन्शन (Pension) मिळू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्याचे मार्ग आणि त्याचे फायदे सांगू. (LIC Jeevan Saral Pension Policy)

ही योजना एक तात्काळ वार्षिकी योजना आहे ज्यामध्ये दोन प्रकारचे पर्याय असतात. पहिल्या पर्यायामध्ये, तुम्ही तुमच्या जोडीदाराला (पती किंवा पत्नी) तुमच्यासोबत समाविष्ट करू शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला पेन्शनची सुविधा मिळत राहते.

दुसऱ्या पर्यायामध्ये, तुम्ही एकरकमी पैसे जमा करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला जमा केलेले पैसे मिळतील.

जर तुम्ही दरमहा पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला दरमहा 1000 रुपये मिळतील. तीन महिन्यांसाठी 3,000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6,000 रुपये आणि एका वर्षासाठी 12,000 रुपये पेन्शन म्हणून.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही योजना खरेदी करण्यासाठी, तुमचे वय 40 ते 80 वर्षांच्या दरम्यान असावे. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती आवडली नाही, तर तुम्ही ती खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांनंतर सरेंडर करू शकता. पॉलिसी सरेंडर केल्यावर, तुम्हाला एकूण जमा केलेल्या रकमेपैकी 95 टक्के परत मिळेल. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील जवळच्या शाखेत जाऊन पेन्शन पॉलिसी घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com