श्रीलंकेत नवीन मंत्रिमंडळाची स्थापना

श्रीलंकेला सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करावा लागत आहे.
Gotabaya Rajapaksa
Gotabaya RajapaksaDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी नवीन मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये 17 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Sri Lankan President appoints news cabinet)

Gotabaya Rajapaksa
Hottest Place In World: तुम्हाला माहितीये का? पाकिस्तानचं 'हे' शहर जगातील सर्वात उष्ण

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांनी नवीन मंत्रिमंडळ स्थापन करून विरोधकांची चाल हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीलंकेला (Sri Lanka) सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करावा लागत आहे. राजपक्षे सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. मंगळवारपासून कोलंबोमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधी पक्षांची आघाडी राजपक्षे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे.

Gotabaya Rajapaksa
''बदला घेणार''! ISIS ने युक्रेन युध्दाचा फायदा घेत...'

एप्रिलमध्ये मंत्रिमंडळाने हा निर्णय दिला होता
यापूर्वी, सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने एएनआयला सांगितले होते की, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी आज होणार आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान (महिंदा राजपक्षे) राहतील. श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी निदर्शनांमुळे राजीनामा दिला. श्रीलंकेतील विरोधी पक्षाने अननुभवी मंत्र्यांसह (Ministers) नवीन मंत्रिमंडळ नियुक्त करण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला विरोध केला. राष्ट्रपतींवर देशातील विरोधकांचा दबाव आहे, त्यामुळे संसदेच्या अधिवेशनापूर्वी नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

गेल्या संसदेच्या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी म्हटले होते की, राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. श्रीलंकेला परकीय चलनाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अन्न आणि इंधन आयात करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेला मित्र देशांकडून मदत घ्यावी लागली. विरोधक पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देशाला विशेष संबोधित करताना लोकांना संयम बाळगण्याची आणि रस्त्यावर उतरणे थांबवण्याची विनंती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com