Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. वृत्तानुसार, राजपक्षे गुरुवारी थायलंडला (Thailand) पोहोचणार आहेत. श्रीलंकन नागरिकांच्या असंतोषामुळे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून पळ काढावा लागला. सात दशकांत मोठ्या आर्थिक संकटाने वेढलेल्या श्रीलंकेत प्रचंड सार्वजनिक निदर्शने होत आहेत. त्यामुळे राजपक्षे 14 जुलै रोजी मालदीवमार्गे सिंगापूरला गेले, असे अहवालात म्हटले आहे.
यापूर्वी, हजारो आंदोलकांनी राष्ट्रपती कार्यालय आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानी तळ ठोकला होता. यामुळे गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांना राष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजपक्षे हे श्रीलंकेचे पहिले राष्ट्रपती ठरले, ज्यांना त्यांच्या कार्यकाळात राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी रविवारी सांगितले की, 'राजपक्षे यांची घरी परतण्याची ही योग्य वेळ नाही. कारण त्यामुळे राजकीय तणाव वाढू शकतो.'
रिपोर्टनुसार, रानिल विक्रमसिंघे म्हणाले होते की, “मला वाटत नाही की, त्यांच्यासाठी परत येण्याची ही योग्य वेळ आहे. ते लवकर परत येण्याची चिन्हे नाहीत.'' असेही वृत्त आहे की, श्रीलंकेच्या (Sri Lanka) विद्यमान सरकारने सिंगापूर (Singapore) सरकारला राजपक्षे यांना आणखी दोन आठवडे राहण्याची मुबा द्यावी अशी विनंती केली आहे. राजपक्षे यांच्या सिंगापूरमधील व्हिसाची मुदत संपल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.