Sri Lanka Crisis: श्रीलंकेत तैनात असणारे भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, भारतीय उच्चायुक्तांनी ट्वीट करुन श्रीलंकेतील भारतीय नागरिकांना देशातील ताज्या घडामोडींची माहिती ठेवण्याचे आणि त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, असेही म्हटले आहे.
दरम्यान, दुसर्या ट्विटमध्ये उच्चायुक्तालयाने म्हटले की, ''सकाळी आमच्या अधिकार्यांनी भारतीय नागरिक आणि भारतीय व्हिसा केंद्राचे संचालक विवेक वर्मा यांची भेट घेतली. जे काल रात्री कोलंबोजवळ एका हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते." ही बाब श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचेही उच्चायुक्तांनी सांगितले आहे.
श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर
विशेष म्हणजे, श्रीलंका (Sri Lanka) सध्या राजकीय अस्थिरतेच्या काळातून जात आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी जनतेच्या प्रचंड विरोधाला तोंड देत देश सोडून पळ काढला. त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणाही केली. ते सध्या सिंगापूरमध्ये (Singapore) आहे. तर दुसरीकडे, रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे.
राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आणीबाणीची घोषणा
20 जुलै रोजी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी काळजीवाहू राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देशात आणीबाणीची (Emergency) घोषणा केली. श्रीलंकेला सर्वात मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.