श्रीलंका रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी पर्याय शोधताना दिसून येत आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने रविवारी सांगितले की, परकीय चलनाच्या साठ्याच्या तीव्र तुटवड्यामुळे अभूतपूर्व आर्थिक संकट असताना श्रीलंका आपला घसरणारा इंधन साठा पुन्हा भरून काढण्यासाठी उत्सुक आहे. रविवारी, पेट्रोलच्या दरामध्ये अनुक्रमे LKR 50 आणि डिझेलच्या दरात LKR 60 ने वाढ झाली आहे, ही दोन महिन्यांतील तिसरी दरवाढ आहे. (Sri Lanka in financial crisis Two ministers to visit Russia to buy oil)
सरकारी मालकीच्या रिफायनरी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने शनिवारी श्रीलंका सरकारला सूचित केले की बँकिंग आणि लॉजिस्टिक कारणांमुळे इंधन शिपमेंट्सच्या आगमनास विलंब झाल्यामुळे हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर परिस्थिती पाहता, श्रीलंकेच्या ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेकेरा यांनी भर दिला की सरकार रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी पर्याय शोधताना दिसून आहे. ते म्हणाले की, “आम्ही राजनैतिक मार्ग शोधत आहोत.
सोमवारी रशियाला भेट देणार दोन मंत्री,
विजेसेकेरा यांनी रविवारी सांगितले की आमचे पहिले क्रेडिट पत्र आंतरराष्ट्रीय बँकांनी नाकारले होते कारण जहाज रशियन कंपनीच्या मालकीचे होते. इंधन आणि इतर राजनैतिक बाबींवर चर्चा करण्यासाठी हे दोन्ही मंत्री सोमवारी रशियाला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात, श्रीलंका सरकारने कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी कोलंबोमधील रशियन दूतावासाने सुचवलेल्या अनेक कंपन्यांशी संपर्क देखील साधला होता.
"दरम्यान, सरकारने फिलिंग स्टेशनवर रांगेत थांबलेल्या लोकांना इंधन पुरवठा करण्यासाठी टोकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे," विजेसेकेरा म्हणाले. पुढे मंत्री म्हणाले की, "हा कार्यक्रम सोमवारपासून लागू केला जाणार, ज्यासाठी सरकारने पोलिस आणि लष्कराकडून सैनिकांची मदत घेतली जाणार आहे."
श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा श्रीलंका 1948 च्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे, ज्यामुळे अन्न, औषध, स्वयंपाकाचा गॅस देशभरामध्ये उपलब्ध आहे. गॅस आणि इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई देखील निर्माण झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.