पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी मतदान केंद्रांबाहेर झालेल्या संघर्षात किमान 20 जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली आहे. सिंध राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले आहे. (Pakistan Violence during civil elections in 14 districts of Sindh province 20 injured)
कंधाकोटमध्ये दोन गटांनी एकमेकांवर लाठीहल्ला केला आणि हल्ल्याचे व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी हाणामारी झाली असून त्यात 20 जण जखमी झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 8 नंतर सुरू झालेले मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले तर चार विभागातील 14 जिल्ह्यांत मतदान झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी जनतेला त्यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफला मतदान करा आणि 'जरदारी माफिया' पक्षाला संपवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष आणि देशाचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
इम्रान खान यांनी ट्विट केले होते की, सिंधमधील चार विभागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. PPP आमच्या उमेदवारांना घाबरवत असूनही आणि कलम 140A अन्वये स्थानिक लोकप्रतिनिधींना अधिकार सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करत नसतानाही, आम्ही निवडणुकीत भाग घेतला आहे. मी सिंधमधील जनतेला पीटीआयच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करतो आणि जरदारी माफियाला संपवण्याचे आवाहन करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.