Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी मालदीवमधून हलवला मुक्काम; आता सिंगापूरमध्ये दाखल

श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देश सोडून पळ काढला
Sri lanka President Gotabaya Rajapaksa
Sri lanka President Gotabaya Rajapaksa Dainik Gomantak
Published on
Updated on

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देश सोडून पळ काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना घेऊन जाणारे सौदी एअरलाइन्सचे विमान सिंगापूरच्या चांगी विमानतळावर पोहोचले आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सिंगापूरमध्ये आगमनाबाबत सिंगापूर सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे वैयक्तिक कामासाठी येथे आले आहेत. त्यांनी आश्रय घेतला नाही, आणि आम्हा त्यांना आश्रय दिलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

Sri lanka President Gotabaya Rajapaksa
Sri Lanka Crisis: श्रीलंकेतून मालदीवमध्ये अन् आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सिंगापूरला जाण्याच्या तयारीत

यापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना घेऊन जाणारे विमान मालदीवमध्ये पोहोचले होते. मालदीवमध्ये काही काळ मुक्काम केल्यानंतर त्यांचे विमान सिंगापूरला रवाना झाले. त्याच वेळी, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या देश सोडण्यात भारत सरकारच्या हस्तक्षेपाच्या चर्चाही आल्या होत्या, परंतु मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी या वृत्तांचे खंडन केले.

Sri lanka President Gotabaya Rajapaksa
10 वर्षीय बलात्कार पीडितेने "गर्भपातासाठी सरकारी नियम मोडले नाहीत", अमेरिकेत चर्चेला जोर

आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर आंदोलकांनी ताबा मिळवला आहे. देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे या दोघांनीही आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी 13 जुलै रोजी सांगितले होते की ते त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, परंतु अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. संतापजनक प्रदर्शन पाहून देशाचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनीही आता देश सोडला आहे. देशातून पळून गेल्याने आता त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com