दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाची पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग

विमानात जास्त तांत्रिक बदल नव्हता मात्र एटीसीच्या मदतीने विमान कराचीत उतरवण्यात आले
Spicejet
Spicejet Dainik Gomantak
Published on
Updated on

SpiceJet Emergency Landing: दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाची पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडानंतर विमान कराचीत उतरवण्यात आले आहे. विमानात जास्त तांत्रिक बदल नव्हता मात्र प्रवाशांना कळल्यानंतर पण तांत्रिक बिघाड सुधरवणे गरजेचे होते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

DGCA कडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 150 प्रवासी होते. क्रूला डाव्या टाकीतून इंधनाच्या प्रमाणात असामान्य घट दिसून आली. एटीसीच्या मदतीने विमान कराचीत उतरवण्यात आले. उड्डाणानंतरच्या तपासणीदरम्यान, डाव्या भागाच्या टाकीतून कोणतीही गळती दिसून आली नाही.

Spicejet
Video: तालिबानी कमांडरने लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून काढली नववधूची वरात

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोणत्याही प्रकारची आणीबाणी घोषित करण्यात आली नाही आणि विमानाचे लॅंडिंगही अगदी सामान्य झाली. याआधी विमानात काही बिघाड झाल्याचे वृत्त नव्हते. या दरम्यान प्रवाशांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. त्याच वेळी, एक विमान कराचीला पाठवले जात आहे जे प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल.

Spicejet
सौदी अरेबियाचे ऐतिहासिक पाऊल, दोन महिलांना दिली सरकारमध्ये मोठी जबाबदारी

दरम्यान, स्पाईसजेटच्या पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानातील आगीची घटना आणि इंडिगो व स्पाइसजेटच्या इतर दोन विमान अपघातांची चौकशी जूनमध्ये सुरू झाली. खरेतर, पाटणा ते दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या फ्लाइटमध्ये 185 लोक बचावले होते जेव्हा विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच आग लागली आणि काही मिनिटांनंतर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com