Video: तालिबानी कमांडरने लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून काढली नववधूची वरात

कमांडरने आपल्या सासरच्या मंडळींना हुंडा म्हणून 12 लाख अफगाणी रुपये दिले
Afghanistan Taliban Commander:
Afghanistan Taliban Commander:Twitter

Afghanistan Taliban Commander: तालिबान (Taliban) कमांडरने आपल्या नवविवाहित वधूला घरी नेण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरचा वापर केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या नववधूला पूर्व अफगाणिस्तानमधील (Afghanistan) लोगर येथून हेलिकॉप्टरने खोस्त प्रांतात घेऊन गेला होता, या आरोपात म्हटले आहे.

Afghanistan Taliban Commander:
Video: अमेरिकेत बंदूकधाऱ्यांचा आतंक, शिकागोमधील गोळीबारात 6 ठार, 24 जखमी

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, अफगाणिस्तानच्या स्थानिक मीडिया खामा प्रेसने सोशल मीडियावर तालिबानी व्यक्तीचे वर्णन तालिबानच्या हक्कानी शाखेचा कमांडर असे केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कमांडर वधूच्या घराजवळ उतरताना दिसत आहे. कमांडरने आपल्या सासरच्या मंडळींना हुंडा म्हणून 12 लाख अफगाणी रुपये दिले आहे. त्या मुलीचे (Bride) लग्न आपल्याशी व्हावे यासाठी कमांडरने मुलीच्या वडिलांना हि रक्कम दिल्याचे सांगण्यात येत आहे. ANI सूत्रांनी दावा केला आहे की तो खोस्त येथे राहतो आणि त्याच्या पत्नीचे घर लोगरच्या बर्की बराक जिल्ह्यात (Barki Barak district) आहे.

तालिबानने कमांडरचा बचाव केला

दरम्यान, तालिबानचे उप प्रवक्ते कारी युसूफ अहमदी यांनी कमांडरचा बचाव करत हा आरोप खोटे असल्याचा युक्तिवाद केला. त्याने कमांडरवरील टिप्पणीला उत्तर देतांना हा "शत्रूचा प्रचार" असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरातने तालिबान कमांडरकडून लष्करी हेलिकॉप्टर वापरल्याचा आरोप फेटाळला आहे. सोशल मीडियावर लोकांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आपला निषेध नोंदवला. हा सार्वजनिक मालमत्तेचा घोर दुरुपयोग असल्याचे ते म्हणाले.

Afghanistan Taliban Commander:
हज यात्रा: सौदी अरेबियाची हिंदीवर नाराजी का? भारतीय मुस्लिम या सुविधेपासून वंचित

महिलांवर अनेक निर्बंध लादले

गेल्या वर्षी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, यावेळची त्यांची सत्ता मागील टर्म (1996 ते 2001 पर्यंत) पेक्षा सॉप्फ कॉर्नर असेल. पण तालिबान आपले वचन पाळताना दिसत नाही, उलट तालिबानी सरकारने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com