Tattoo Love: वा रे पठ्ठ्या! संपूर्ण शरीरावर टॅटू काढण्यासाठी केला 29 लाखांचा चुराडा

Man Spends 29 Lakhs on Tattoos: तुरुंगातून सुटल्यानंतर, एका व्यक्तीने आपल्या शरीरावर टॅटू बनवण्यासाठी £30,000 (INR 29,57,647.27) इतका खर्च केला.
Ian
IanDainik Gomantak

Tattoo Love: सोशल मीडियावर आपण रोज हटके व्हिडीओ पाहत असतो. यातच आता तुरुंगातून सुटल्यानंतर, एका व्यक्तीने आपल्या शरीरावर टॅटू बनवण्यासाठी £30,000 (INR 29,57,647.27) इतका खर्च केला. मिररच्या म्हणण्यानुसार, डेली स्टारने वृत्त दिले आहे की, इयान ग्रिग्सने स्वत: ला बदलण्यासाठी तब्बल 300 तास खर्च केले, आणि आता त्याचे संपूर्ण शरीर टॅटूमय झाले आहे.

दरम्यान, इयानला त्याच्या खास शैलीमुळे अभिनेता म्हणून नवीन काम मिळाले आहे. तो बॉन्डेड बाय ब्लड आणि लेगसीसह इतर चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अंमली पदार्थ बाळगणे, पुरवठा करण्याचा हेतू आणि हिंसक कृत्ये यासाठी 12 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आपल्या शरीरावर टॅटू काढले.

Ian
Indo-US Military Exercise: भारताची चीनला खुन्नस; थेट LAC जवळ अमेरिकेसोबत युद्धसराव

तसेच, टॅटू काढणे इयानसाठी एक नवीन सुरुवात होती. जरी त्याने वयाच्या 18 व्या वर्षी त्याचा पहिला टॅटू काढला असला तरी, हार्डकोर इंकवरील त्याचे प्रेम सात वर्षांपूर्वी, 2015 मध्ये, जेव्हा तो तुरुंगातून सुटला तेव्हा फळाला आले. चार वर्षांपर्यंत, तो दर आठवड्याला दोन तास टॅटू काढण्यात घालवायचा आणि जेव्हा त्याच्या शरीरावर जागा उरली नाही तेव्हाच तो थांबला.

'आयुष्यातील सर्वात कठीण क्षण'

इयानच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आला जेव्हा 2008 मध्ये त्याची प्रेमिका लिआन एका कार अपघातात गेली. त्यावेळी तो तुरुंगात होता.

Ian
चीनचा LAC वरुन सैन्य मागे घेण्यास नकार; भारताची डोकेदुखी पुन्हा वाढणार ?

त्याला माझी सर्वात जास्त गरज होती

इयानच्या म्हणण्यानुसार, 'माझ्या मुलाचा जन्म मी तुरुंगात असताना झाला होता, त्यानंतर मी त्याला बऱ्याच वर्षांनी भेटलो. मात्र त्यावेळी त्याला माझी सर्वात जास्त गरज होती.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com