Kosk nose cover mask
Kosk nose cover maskTwitter

अरे देवा! फक्त नाक झाकण्यासाठी बनवला विचित्र मास्क!

कोस्क नोज कव्हर मास्क (Kosk nose cover mask) नावाचा एक नवीन मास्क दक्षिण कोरियामध्ये लाँच करण्यात आला आहे ज्याला खूप मागणी आहे.
Published on

जगात कोरोनाचा (Covid-19) तांडव अजूनही सुरू आहे. भारतासह (India) अनेक देशांमध्ये कोरोनाची रोज नवी सक्रिय प्रकरणे आढळत आहेत. भारतातील कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने घट झाली असली तरी धोका अजूनही संपलेला नाही. सोशल डिस्टंन्स आणि मास्क आवश्यक आहे. पण या सगळ्यामध्ये आजकाल एका खास प्रकारचा मास्क खूप चर्चेत आहे. असा मास्क दक्षिण कोरियामध्ये (South Korea) बनवण्यात आला आहे जो फक्त नाक झाकू शकतो. पण अशा मास्कचा उपयोग काय आहे ज्यामुळे तोंड उघडे राहील, ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो? (Kosk nose cover mask)

कोस्क नोज कव्हर मास्क (Kosk nose cover mask) नावाचा एक नवीन मास्क दक्षिण कोरियामध्ये लाँच करण्यात आला आहे ज्याला खूप मागणी आहे. हा मास्क एका खास उद्देशाने बनवण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लोक बाहेर जेवायला जातात तेव्हा त्यांना संपूर्ण मास्क काढून खावे लागते. पण आता असे होणार नाही. मास्क लावून आपल्याला जेवण करता (Mask to cover nose while eating) येणार आहे.

Kosk nose cover mask
फाइझर 5 वर्षांखालील मुलांसाठी कोविड लसीसाठी यूएसची घेणार परवानगी : अहवाल

फक्त नाकासाठी वापरला जातो मास्क

कोस्क मास्क जेवण करताना वापरता येइल अशा डिझाइनचा तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे तोंड उघडे राहिल आणि नाकावर मास्क राहिल जेणेकरून व्यक्ती सहज जेवू शकेल. काही लोकांना मास्क आवडला आहे पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची खिल्ली उडवली जात आहे.

Kosk nose cover mask
चीनचा राजकीय खेळ रशिया सोबत 'या' मुद्यांवरुन हातमिळवणी

तज्ज्ञांनी केली मास्कवर टीका

द गार्डियन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, कोरियन कंपनी Atmen ने हा मास्क बनवला असून त्याची किंमत 607 रुपये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा मास्क नियमित मास्कच्या खाली घातला जातो. जेवण करताना तुम्ही वरचा मास्क काढू शकता. सोशल मीडियावर मास्कला खूप ट्रोल केले जात आहे. फक्त नाक झाकण्याची कल्पना खूप विचित्र आहे त्यापेक्षा माणसांनी मास्क न घालणे चांगले आहे, असे ऑस्ट्रेलियातील डीकिन युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर कॅथरीन बेनेट यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com