चीनचा राजकीय खेळ रशिया सोबत 'या' मुद्यांवरुन हातमिळवणी

नाटोच्या विस्तार योजनेला विरोध करताना चीनने रशियाशी हातमिळवणी केली आहे.
Chaina
ChainaDainik Gomantak
Published on
Updated on

युक्रेनसोबतच्या (Ukraine) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने (Chaina) शुक्रवारी रशियाशी (Russia) सहमती दर्शवत नाटोच्या विस्ताराला विरोध दर्शवला आहे. त्याच वेळी, मॉस्कोने अप्रत्यक्षपणे क्वाड (QUAD) वर आक्षेप घेतला आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात बीजिंगच्या संघटनेच्या विरोधाचे समर्थन केले आहे. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी बैठक घेतली. यादरम्यान दोघांमध्ये युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि संयुक्त निवेदन देखील जारी केले. दोन्ही देशांनी अमेरिका (America) आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध आघाडी मजबूत करण्याचा आग्रह धरला होता.

Chaina
कोरोना दरम्यान जगात नवीन आपत्ती, HIV चे अत्यंत विषाणूजन्य प्रकार सापडले

युक्रेनच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशियामध्ये तणाव वाढत आहे, मात्र याच दरम्यान चीनने रशियाला पाठिंबा दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध पुन्हा नव्याने संब्ध घट्ट करण्याचा आग्रह धरला आहे. त्याचवेळी नाटोच्या विस्तार योजनेला विरोध करताना चीनने रशियाशी हातमिळवणी देखील केली आहे.

चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या मैत्रीबाबत अमेरिकेनेही आक्रमक भूमिका घेतली. युक्रेनवरील आक्रमणानंतर चीन आणि रशिया यांच्यातील मैत्रीची भरपाई होऊ शकणार नाही, असे अमेरिकेचे स्पष्ट मत आहे. युक्रेनवर हल्ला झाला तर त्याचा मित्र चीनही रशियाला वाचवू शकणार नाही, यामुळे रशियाची अर्थव्यवस्था आणखी नष्ट होऊ शकते.

Chaina
बीएनए ने वाढवली पाकिस्तानी लष्कराची डोकेदुखी

युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या परिणामांची भरपाई करण्यासाठी रशिया आणि चीनमधील घनिष्ठ संबंध तयार नसतील आणि रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी रशियाला दिला आहे. युक्रेनवर हल्ला झाल्यास भयंकर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशारा अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियाला दिला. अनेक वेळा इशारा देऊनही हजारो रशियन सैनिक युक्रेनच्या सीमेवर शस्त्रास्त्रांसह तैनात आहेत. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com