South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Johannesburg Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेची आर्थिक राजधानी असलेल्या जोहान्सबर्ग शहराच्या पश्चिम भागात भीषण गोळीबाराची घटना घडली.
Johannesburg Mass Shooting
Johannesburg Mass ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेची आर्थिक राजधानी असलेल्या जोहान्सबर्ग शहराच्या पश्चिम भागात भीषण गोळीबाराची घटना घडली. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. अज्ञात हल्लेखोरांच्या एका टोळीने केलेल्या या अंधाधुंद गोळीबारात 20 जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन निष्पाप बालकांचाही समावेश असल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर तातडीने घटनास्थळावरुन पसार झाले असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही भीषण घटना जोहान्सबर्गच्या पश्चिमेकडील एका भागातील दारुविक्री केंद्राच्या जवळ घडली. हे ठिकाण दक्षिण आफ्रिकेतील काही मोठ्या सोन्याच्या खाणींच्या जवळ असल्याने येथे कामगारांची आणि मजुरांची मोठी वर्दळ असते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ दारुविक्री केंद्रालाच लक्ष्य केले नाही, तर रस्त्यावरुन जाणाऱ्या निरपराध नागरिकांनाही आपल्या गोळ्यांचा निशाणा बनवले. हल्लेखोरांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कारणाशिवाय फायरिंग सुरु केली, ज्यामुळे परिसरात एकच धांदल उडाली. अनेक लोकांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Johannesburg Mass Shooting
F 35 Fighter Jet Crash: पायलट थोडक्यात बचावला, जगातील सर्वात प्रगत लढाऊ फायटर जेट अलास्कामध्ये कोसळले Watch Video

हल्लेखोरांचा तपास आणि पोलिसांची भूमिका

गौतेंग प्रांताच्या पोलीस प्रवक्त्या ब्रिगेडियर ब्रेंडा मुरीडिली यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, हल्लेखोर नेमके कोण होते आणि त्यांचा या कृत्यामागील उद्देश काय होता, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी घटनास्थळावरुन पुराव्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे.

गौतेंगचे कार्यवाहक पोलीस (Police) आयुक्त फ्रेड केकाना यांनी सांगितले की, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हेगारी व्यवस्थापन टीम, प्रांतीय गुन्हे स्थळ व्यवस्थापन टीम आणि स्थानिक गुन्हे नोंद केंद्राची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

याव्यतिरिक्त, गुन्हेगारी गुप्तचर यंत्रणा आणि प्रांतीय गुन्हे शोध पथकही हल्लेखोरांच्या मागावर आहेत. स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवले जात असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Johannesburg Mass Shooting
China Fire Tragedy: चीनमध्ये निवासी इमारतीला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

अवैध व्यवसायांचे जाळे आणि गुन्हेगारी

ज्या ठिकाणी हा गोळीबारा झाला, त्या परिसराबाबत पोलिसांनी एक महत्त्वाची माहिती दिली. हा भाग सोन्याच्या खाणींनी वेढलेला असून येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवसायांचे जाळे पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दारुविक्री केंद्राजवळ ही घटना घडली, तिथे बेकायदेशीरपणे दारुची विक्री केली जात होती. दक्षिण आफ्रिकेतील खाणकाम क्षेत्रांमध्ये अनेकदा अशा बेकायदेशीर अड्ड्यांवरुन टोळीयुद्ध किंवा वर्चस्व वादातून हिंसाचाराच्या घटना घडत असतात. या घटनेमागेही अशाच प्रकारचे काही कारण असू शकते का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Johannesburg Mass Shooting
PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

दक्षिण आफ्रिकेत गुन्हेगारीचा विळखा

दक्षिण आफ्रिकेतील ही काही पहिलीच मोठी गोळीबारीची घटना नाही. याच महिन्याच्या सुरुवातीला 6 डिसेंबर रोजी प्रिटोरिया शहराजवळील एका हॉस्टेलवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये एका तीन वर्षांच्या बालकासह 12 जणांचा मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील हिंसक गुन्हेगारीचे प्रमाण आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंतेचा विषय ठरले आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, या देशात हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNODC) 2023-24 च्या अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेचा हत्या दर प्रति एक लाख लोकांमागे 45 इतका आहे, जो अत्यंत भयावह मानला जातो.

Johannesburg Mass Shooting
Regent International, China: जगातील सर्वात मोठी सोसायटी, इथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंबे; आयुष्यभर...

सरकार आणि पोलिसांची कारवाई

वाढत्या गुन्हेगारीमुळे दक्षिण आफ्रिका (South Africa) सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. दरम्यान, पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर अड्ड्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पोलिसांनी देशभरातील सुमारे 12,000 बेकायदेशीर दारुविक्री केंद्रे बंद केली असून या प्रकरणी 18,000 हून अधिक लोकांना अटक केली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया करुनही अशा प्रकारचे भीषण सामूहिक हत्याकांड थांबवण्यात पोलिसांना पूर्णपणे यश आलेले नाही. जोहान्सबर्गमधील ही ताजी घटना म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

Johannesburg Mass Shooting
Regent International, China: जगातील सर्वात मोठी सोसायटी, इथे राहतात तब्बल 20 हजार कुटुंबे; आयुष्यभर...

सध्या या परिसरामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून, स्थानिक रहिवासी आपल्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. पोलीस आणि विशेष तपास पथके हल्लेखोरांना पकडण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही. या घटनेतील मृत चिमुरड्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण देश या निर्दयी कृत्याचा निषेध करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com