जगभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज मिळालेल्या माहितीनुसार युक्रेन - रशिया युद्धात 16 युक्रेन नागरिक मारले गेले आहेत. तर 59 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. तसेच अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या हद्दीत एका ट्रकमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील पूर्व लंडन शहरातील एका नाईट क्लबमध्ये ही 21 अल्पवयीन मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (south africa 21 teens children die in bar)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अल्पवयीन मुलांनी अपायकारक पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायले असल्याने हे मृत्यू झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वृत्त असे की, दक्षिण आफ्रिकेतील एका नाईट क्लबमध्ये अपघाताने विषारी पदार्थ खाल्ल्याचा किंवा पिण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेतील एका नाईट क्लबमध्ये 21 अल्पवयीन मुलांचा गूढ मृत्यू झाल्याने संपूर्ण दक्षिण आफ्रिका हादरला आहे. ईस्टर्न केप प्रांतातील ईस्ट लंडन शहरातील नाईट क्लबमध्ये सोमवारी ही घटना घडली.
याबाबत पोलिसांचे म्हणणे असे आहे की, या अल्पवयीन मुलांनी अनावधाणाने विषारी खाल्ले, प्याले किंवा वास घेतल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत अल्पवयीन मुलांपैकी काही जण शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर उत्सवासाठी आणि काही वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून अल्पवयीन मुलांमध्ये दारू पिण्याच्या प्रथेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेचे सोशल मीडियावर फिरत असलेल्या छायाचित्रांमध्ये अल्पवयीन मुले इकडे तिकडे नाईट क्लबच्या मजल्यावर दिसतात. काही मुले टेबल आणि पलंगांवर पडून आहेत. त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नाही. या घटनेने व्यथित होत अध्यक्ष सिरिल रामाफोसा, जे जर्मनीतील G7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते, त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की 18 वर्षांखालील मुलांना नाइटक्लबमध्ये एकत्र येण्याची परवानगी देण्यात आल्याबद्दल त्यांना चिंता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.