पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीहून UAE ला रवाना, नवीन अध्यक्षांची घेणार भेट

पैगंबर वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुस्लिम देशाच्या दौऱ्यावर.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak

मोहम्मद पैगंबर यांच्या वरून (Prophet Muhammad) झालेल्या वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदाच मुस्लिम देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. G-7 मध्ये भाग घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आज संयुक्त अरब अमिरातीला (UAE) भेट देणार आहेत. येथे मोदी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांची देखील भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा संक्षिप्त दौरा असणार आहे. (Prime Minister Narendra Modi leaves Germany for UAE)

Prime Minister Narendra Modi
रशियाचा युक्रेनच्या मॉलवर क्षेपणास्त्र हल्ला, 16 ठार, 59 जखमी

नाह्यान यांचे 13 मे रोजी निधन झाले होते. त्यांनी 3 नोव्हेंबर 2004 रोजी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. UAE हा भारताचा प्रमुख भागीदार आहे आणि अशा स्थितीत या भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होणार असल्याचे स्पष्ट झाले. पैगंबर वादानंतर पीएम मोदींचा यूएई दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

UAE हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे,

UAE हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तसेच दोन्ही देशांमध्ये 60,664.37 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. ज्यामध्ये भारत 38,901.88 कोटी रुपयांची आयात करतो आणि निर्यात 21,762.49 कोटी रु. वाणिज्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, UAE ने भारताला पेट्रोलियम उत्पादने, मौल्यवान धातू, दगड, रत्ने आणि दागिने, खनिजे, अन्नधान्ये, साखर, फळे आणि भाज्या, चहा, मांस आणि समुद्री खाद्यपदार्थ, कापड, अभियांत्रिकी आणि यंत्रसामग्री उत्पादने आणि रसायने निर्यात करतो.

Prime Minister Narendra Modi
US: धक्कादायक! ट्रकमध्ये आढळले तब्बल 42 मृतदेह

G-7 शिखर परिषदेदरम्यान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चहापानावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी चहापानावर विविध द्विपक्षीय आणि जागतिक विषयांवरती चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारपासून दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर गेले होते तिशे दोन्ही नेत्यांनी श्लोस एलमाऊ येथे G7 शिखर परिषदेच्या बाजूला चहापानावर चर्चा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com