आफ्रिका खंडात पसरलेले सहारा वाळवंट त्याच्या तीव्र उष्णता आणि वाळूच्या विस्तीर्ण मैदानासाठी ओळखले जाते. परंतु इथून अशी विचित्र घटना समोर आली आहे, ज्याने लोक हैराण झाले आहेत. जिथे जानेवारी महिन्यात बहुतेक थंड भागात बर्फ असतो. त्याचवेळी सहारा वाळवंटात (Sahara Desert) बर्फवृष्टी झाली आहे. यानंतर वाळूवर बर्फाची चादर अंतरलेली पाहायला मिळाली आहे. सोमवारी तापमान शून्याच्या खाली गेल्यानंतर उत्तर-पश्चिम अल्जेरियातील ऐन सेफ्रा शहरातील एक भाग बर्फाच्या चादरीने व्यापला. गेल्या 42 वर्षात शहरात हिमवृष्टी होण्याची ही पाचवी वेळ आहे. तापमान -2 अंशापर्यंत खाली जात असल्याने या शहरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा कडाखा सहन करावा लागत आहे. (Snow has fallen in the Sahara Desert)
ऐन सेफ्रा हे शहर 'वाळवंटाचे प्रवेशद्वार' (Desert) म्हणून ओळखले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर उंचीवर असून अॅटलास पर्वतांनी वेढलेले आहे. सहारा वाळवंटाने उत्तर आफ्रिकेचा बहुतेक भाग व्यापला आहे. गेल्या काही लाख वर्षांमध्ये तापमान आणि आर्द्रतेमध्ये बदल झाले आहेत.
तथापि, हे सर्वज्ञात आहे की, वाळवंट भागात रात्री तापमानात लक्षणीय घट होते. परंतु यावरुन सहसा हिमवर्षाव दिसत नाही. मात्र हे अंशतः आर्द्रतेच्या कमी पातळीमुळे आहे. मात्र बर्फवृष्टीमुळे रखरखत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
त्याच वेळी, सध्या सहारा वाळवंट हा अतिशय कोरडा आणि उष्ण प्रदेश आहे. परंतु एक काळ असा होता की, तो बऱ्यापैकी हिरवागार असा प्रदेश होता. 15 हजार वर्षांपूर्वी सहारा वाळवंट हिरवेगार होते. काही लोक म्हणतात की, इथे काही भागात तलाव देखील होते.
शिवाय, या महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियातील (Saudi Arabia) ताबूक शहरामध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. रात्री तापमानात इतकी घसरण झाली होती की, पहाटे डोंगरावर बर्फ गोठला होता. जबल अल-लवाज पर्वताचा माथा पूर्णपणे पांढऱ्या बर्फवृष्टीने झाकोळलेला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.