पेंटागॉनने जारी केला हवाई हल्ल्याचा व्हिडिओ, अमेरिकेच्या 'चुकी'मुळे 10 अफगाण नागरिक ठार

अमेरिकन गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ISIS च्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते, परंतु हा हल्ला चुकीच्या ठिकाणी झाला. यामध्ये सात मुलांसह 10 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
Drone Attacks
Drone AttacksDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकन सैन्याने बुधवारी 29 ऑगस्ट रोजी झालेल्या काबूलमधील अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला, ज्यात सात मुलांसह 10 अफगाण नागरिक ठार झाले. अमेरिकन गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ISIS च्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते, परंतु हा हल्ला चुकीच्या ठिकाणी झाला. यामध्ये सात मुलांसह 10 नागरिकांना (Afghan Citizen) आपला जीव गमवावा लागला. (Pentagon releases video of airstrikes 10 Afghan citizens killed in US mistake)

न्यू यॉर्क टाइम्सने यूएस सेंट्रल कमांड विरुद्ध माहिती स्वातंत्र्य कायद्याच्या खटल्याद्वारे फुटेज मिळाल्यानंतर ते आपल्या वेबसाइटवर पोस्ट केले. 29 ऑगस्टच्या ड्रोन हल्ल्याचे हे पहिले सार्वजनिकरित्या जारी केलेले व्हिडिओ फुटेज आहे. ज्याचा पेंटागॉनने (Pentagon) सुरुवातीला बचाव केला परंतु नंतर त्यास मोठी चूक झाली असल्याचे म्हटले. व्हिडिओमध्ये सुमारे 25 मिनिटांचे फुटेज आहे, ज्यामध्ये दोन ड्रोनचे वर्णन 'न्यूयॉर्क टाइम्स'ने MQ-9 रीपर ड्रोन म्हणून केले आहे. हल्ल्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर रस्त्यावरील कारवर हल्ला केल्याची दृश्ये या फुटेजमध्ये दिसत आहेत.

Drone Attacks
चीनी लोकांवर डाळ खाऊन दिवस काढण्याची वेळ

अमेरिकेने आपली चूक मान्य केली

लष्कराने सांगितले की, आम्ही अफगाणिस्तानमधील (Afghanistan) इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित असलेल्या एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. ज्याने काबूल (Kabul) विमानतळाजवळ बॉम्बस्फोट केला होता. जिथून नंतर लोक पळून गेले होते. तीन दिवसांपूर्वी, विमानतळावरील आत्मघाती बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिक आणि 160 हून अधिक अफगाण नागरिक ठार झाले होते. 29 ऑगस्टच्या ड्रोन हल्ल्यात लष्कराने नंतर आपली चूक कबूल केली, तेव्हा केंद्रीय कमांडने स्पष्ट केले की, कार चालकाचा IS गटाशी काहीही संबंध नाही.

तालिबानच्या राजवटीनंतर लोक देश सोडून पळून जातायेत

या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव झेमारी अहमदी (Zemari Ahmadi) होते. ते न्यूट्रिशन अँड एज्युकेशन इंटरनॅशनल या अमेरिकास्थित मदत संस्थेसाठी काम करत होते. विशेष म्हणजे तालिबान अफगाणिस्तान पुन्हा नव्याने सत्तेत आल्यानंतर लोक पळून जाऊ लागले. तथापि, या सीमा क्रॉसिंगवर तालिबानने कब्जा केला, त्यानंतर लोकांनी काबूल विमानतळावरुन बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी काबूल विमानतळावर हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिला होता. यानंतर 26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर स्फोट झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com