यूएस (US) सिनेटमधील रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल (Mitch McConnell) यांच्यासह सिनेटर्सच्या शिष्टमंडळाने शनिवारी कीव येथे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची अचानक भेट घेतली. यावेळी त्यांनी रशियासोबतच्या (Russia Ukraine War) युद्धात युक्रेनसोबत अमेरिकेची (America) एकजूट असल्याचे जाहिर केले. (In the wake of the Russia war a US congressional delegation has met with Volodymyr Zelenskyy)
"आमचे शिष्टमंडळ राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पुन्हा सांगते की युनायटेड स्टेट्स युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," मॅककोनेल यांनी युक्रेन सोडल्यानंतर एका निवेदनात असे म्हटले आहे. युक्रेन हे युद्ध जिंकेपर्यंत त्यांना अमेरिकेचा पाठिंबा राहील.
झेलेन्स्कीच्या टेलिग्राम खात्यावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅककॉनेल, सुसान कॉलिन्स, जॉन ब्रासो आणि जॉन कॉर्निन राजधानी कीवमध्ये एकत्र भेटताना दिसून येत आहेत. युक्रेनच्या अध्यक्षांनी त्यांच्या टेलीग्राम पोस्टमध्ये या भेटीचे वर्णन "युक्रेनला यूएस कॉंग्रेस आणि लोकांकडून द्विपक्षीय समर्थनाचे मजबूत संकेत असतील" असे केले आहे.
रात्री झालेल्या एका व्हिडिओ संबोधनात, झेलेन्स्की म्हणाले की, "मला विश्वास आहे की, यूएस खासदारांची ही भेट अमेरिकन लोक आणि युक्रेनमधील मजबूत संबंध असल्याचे जाहीर करते." आम्ही युक्रेनसाठी संरक्षण आणि वित्त यांसह मजबूत सहकार्यावर तसेच रशियावरील निर्बंध आणखी कडक करण्यावर चर्चा केली आहे. यूएस शिष्टमंडळाची ही भेट अशा वेळी झाली आहे की, जेव्हा सिनेट युक्रेनसाठी सुमारे 40 अब्ज डॉलर्सचे पॅकेज मंजूर करण्यावर काम करत आहे. गेल्या काही आठवड्यांतील उच्चस्तरीय यूएस काँग्रेसच्या शिष्टमंडळाची युक्रेनला झालेली दुसरी भेट आहे.
यापूर्वी, सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी डेमोक्रॅट खासदारांच्या गटासह 1 मे रोजी युक्रेनमध्ये भेटीला आल्या होत्या. यादरम्यान त्यांनी झेलेन्स्की यांना वचन दिले की युद्ध संपेपर्यंत अमेरिका त्यांच्या पाठीश उभी राहणार आहे. त्याच वेळी, फर्स्ट लेडी जिल बिडेन, मदर्स डे निमित्त झेलेन्स्कीची पत्नी ओलेना झेलेन्स्का यांना भेटण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी पश्चिम युक्रेनला गेल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.