चीनमध्ये आर्थिक मंदीची चिन्हे? Alibaba कंपनीने 10 हजार लोकांना काढले कामावरून

अनेक दिवसांपासून जगभरात चर्चा आहे की चीनचे अनेक मोठे उद्योग अडचणीमध्ये आले आहेत.
Alibaba
AlibabaDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक दिवसांपासून जगभरात चर्चा आहे की चीनचे अनेक मोठे उद्योग (economic crisis) अडचणीमध्ये आले आहेत. दरम्यान, चीनची दिग्गज टेक कंपनी अलीबाबा बद्दल आलेले अहवाल येथे जरा भीतीदायक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अलीबाबाने जून तिमाहीमध्ये आपल्या सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टेकले आहे. एवढेच नाही तर या वर्षभरात हा आकडा 13 हजारांच्या पार झाला आहे. (Signs of economic slowdown in China Alibaba company fired 10 thousand people from work)

Alibaba
गर्भपाताच्या प्रकरणात फेसबुकने शेअर केली चॅट हिस्ट्री, यूजर्स संतापले

सहा महिन्यांत 13 हजारांहून अधिक कर्मचारी गुंतले!

अहवालानुसार, जून तिमाहीत 9241 हून अधिक कर्मचार्‍यांनी अलीबाबा (alibaba) सोडले कारण कंपनीने स्वतःचे एकूण कर्मचारी 2,45,700 पर्यंत कमी केले आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की एकतर कंपनीने त्यांना काढून टाकले आहे. एवढेच नाही तर या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीने एकूण 13,616 कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचे समोर आले आहे.

मार्च 2016 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असायुक्तिवाद अलीबाबाच्या अध्यक्षांनी केला आहे. मात्र, आता कंपनीनेही या प्रकरणावरती आपली बाजू मांडली आहे. अहवालानुसार, अलीबाबाचे अध्यक्ष आणि सीईओ डॅनियल झांग योंग यांनी सांगितले की, कंपनी यावर्षी सुमारे 6000 नवीन विद्यापीठ पदवीधरांना आपल्या मुख्यसंख्येमध्ये जोडणार आहे. त्याचवेळी, चीनमधील विक्रीत घट आणि आर्थिक मंदीमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तूर्तास, हे प्रकरण किती पुढे जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com