गर्भपाताच्या प्रकरणात फेसबुकने शेअर केली चॅट हिस्ट्री, यूजर्स संतापले

फेसबुकने गर्भपात प्रकरणाचा तपास करणाऱ्या यूएस पोलिसांसोबत युजरची संपुर्ण चॅट हिस्ट्री शेअर केली आहे.
Facebook
Facebook Dainik Gomantak
Published on
Updated on

फेसबुकने (Facebook) गर्भपात प्रकरणाचा (Abortion) तपास करणाऱ्या यूएस पोलिसांसोबत युजरची संपुर्ण चॅट हिस्ट्री शेअर केली आहे. यामुळे युजर्समध्ये नाराजी पसरली असल्याचे दिसून येते आहे. एका आईवर तिच्या मुलीचा गर्भपात केल्याचा गुन्हेगारी आरोप झाल्यानंतर सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने त्या महिलेची चॅट हिस्ट्री सरकारी अधिकाऱ्यांसोबत शेअर केली आहे. जूनच्या उत्तरार्धात, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे अधिकार रद्द केल्यानंतर तज्ञांनी अशा प्रकारच्या आणखी प्रकरणांचा इशारा दिला आहे. कारण मोठमोठ्या टेक कंपन्यांकडे वापरकर्त्यांचा पर्सनल डेटा भरपूर प्रमाणात साठवलेला असतो. (Facebook shares chat history in case of abortion users are angry)

Facebook
PM मोदी अन् पोप फ्रान्सिस देणार जगाला शांततेचा संदेश

वृत्तानुसार, जेसिका बर्गेस (41) हिच्यावर तिच्या 17 वर्षांच्या मुलीला नेब्रास्का या मध्य-पश्चिमी यूएस राज्यामध्ये गर्भधारणा करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्यावर पाच आरोप करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2010 मधील एक कायद्याचा देखील समावेश आहे जो गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतरच गर्भपात करण्यास परवानगी देतो. गर्भपातानंतर गर्भ लपवणे किंवा सोडून देणे यासह मुलीवर तीन आरोप देखील लावण्यात आले आहेत.

तरीही फेसबुकचे मालक मेटा यांनी मंगळवारी नेब्रास्का न्यायालयाच्या आदेशावर स्वतःचा बचाव केला आहे. डेटा हस्तांतरित करण्याबद्दल विचारले असता, सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गज फेसबुकने सरकारी विनंत्यांचे पालन करण्याच्या धोरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. फेसबुकने म्हटले की जेव्हा कायद्याने आम्हाला हे करण्याची आवश्यकता असते तेव्हा ते केले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या खूप आधी नेब्रास्काने गर्भपात निर्बंध स्वीकारले आहेत. अमेरिकेतील सुमारे 16 राज्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात काही नियमांनुसार गर्भपातावरती बंदी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com