'ज्या निवडणूक प्रचारात आबे यांना गोळ्या घालण्यात आल्या...', किशिदा 2025 पर्यंत PM

रविवारी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत जपानचा सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या आघाडी पक्षांनी दणदणीत विजय मिळवला.
Parliamentary Elections
Parliamentary Elections Dainik Gomantak
Published on
Updated on

Parliamentary Elections: रविवारी पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत जपानचा सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या आघाडी पक्षांनी दणदणीत विजय मिळवला. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि त्याचा सहयोगी पक्ष कोमाटो यांना 248 सदस्यांच्या सभागृहात 146 मते मिळाली, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहेत. पंतप्रधान फुमियो किशिदा 2025 पर्यंत पदावर राहतील. विशेष म्हणजे, या विजयाने राष्ट्रीय सुरक्षा आणि दीर्घकालीन धोरणांवर ते काम करत राहतील हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, संसदेच्या (Parliament) वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल किशिदा यांनी सर्वांचे आभार मानले, परंतु यावेळी ते असह्य दिसले. आबे यांच्या हत्येतून सावरण्याची आणि पक्षाला एकसंध ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते पुढे म्हणाले की, 'पक्षाची एकजूट इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे. कोरोनाचा सामना करताना, रशियाचे युक्रेनवरील (Ukraine) आक्रमण आणि वाढत्या किमती रोखणे हा आमचा प्राधान्यक्रम असणार आहे.' राज्यघटनेत सुधारणा करण्यासाठी झपाट्याने काम करणार असल्याचेही ते म्हणाले.

Parliamentary Elections
शिंजो आबे यांना का घातल्या गोळ्या? शूटरने दिली पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

देशाला हिंसाचारापासून वाचवण्यावर नेत्यांचा भर

आबे यांची हत्या आणि त्यानंतरच्या निवडणूक निकालांना नवे अर्थ आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे हिंसेपासून संरक्षण करण्याची गरज देशातील सर्व नेत्यांनी व्यक्त केली आहे. किशिदा पुढे म्हणाले की, 'आपण निवडणूक जिंकतो, याचा अर्थ खूप मोठा आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच राहतील.'

Parliamentary Elections
Shinzo Abe Death: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

भाषणादरम्यान आबे यांच्यावर गोळी झाडण्यात आली

जपानमधील (Japan) सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक असलेल्या आबे यांची शुक्रवारी निवडणूक रॅलीत भाषण करताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बंदूक नियंत्रणाचे कडक कायदे असलेल्या जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जपानमधील लोकांना या घटनेने मोठा धक्का बसला. आबे यांनी नारा शहरात भाषण सुरु केल्यानंतर हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. आबे यांना एअरलिफ्ट करुन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com