

Michael Rubin Warning Tarique Rahman Sheikh Hasina Safety: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना 16 डिसेंबर 2026 रोजी विजय दिनानिमित्त मायदेशी परतणार आहेत. मात्र, त्यांच्या या परतण्यावरुन अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना कडक इशारा दिला. शेख हसीना किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जर काहीही इजा झाली, तर त्याला पूर्णपणे तारिक रहमान आणि त्यांचे सरकारच जबाबदार असेल, असे रुबिन यांनी ठणकावून सांगितले.
न्यूयॉर्कमध्ये 'बांगलादेशचे भविष्य' या विषयावर आयोजित एका चर्चासत्रात बोलताना रुबिन यांनी ही भूमिका मांडली. शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या केसालाही धक्का लागल्यास रहमान सरकार जबाबदार राहील, असा थेट संदेश अमेरिकेचे राजदूत आणि इतर देशांच्या अधिकाऱ्यांनी ढाका प्रशासनाला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, भारतानेही बांगलादेशातील सत्ताधाऱ्यांशी कोणतीही तडजोड न करता शेख हसीना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही रुबिन म्हणाले.
दुसरीकडे, 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या आंदोलनानंतर भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांनी 16 डिसेंबरला दिल्लीहून ढाक्याला परतण्यासाठी बांगलादेश सरकारकडे विमान आणि आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. 'बिमान बांगलादेश एअरलाइन्स'द्वारे परतण्याची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांचे प्रवक्ता सय्यद मोजम्मेल अली यांनी म्हटले.
मात्र, बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी हसीना यांना परत आणण्यासाठी भारताशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्या बांगलादेशात पाऊल ठेवताच त्यांना अटक करुन तुरुंगात टाकले जाईल आणि कायदा आपले काम करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.