Cricket Catch: क्रिकेट इतिहासातील अप्रतिम झेल, तुफान व्हायरल होतोय 'या' भावाचा व्हिडिओ

एका गावाकडील क्रिकेट स्पर्धेत युवकाने घेतलेले झेल सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. सर्वानांच हा व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरत नाहीये.
Belgaum Viral catch
Belgaum Viral catchDainik Gomantak
Published on
Updated on

Belgaum Viral catch: क्रिकेटमध्ये आजवर अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या घटना घडल्या आहेत. ते मग क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी किंवा गोलंदाजी असो. सहसा क्षेत्ररक्षणात अनेक साहसी पद्धतीने झेल घेतल्याच्या किंवा चेंडू रोखल्याच्या घटना समोर येत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

एका गावाकडील क्रिकेट स्पर्धेत युवकाने घेतलेले झेल सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. सर्वानांच हा व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरत नाहीये.

Belgaum Viral catch
Delhi Mumbai Expressway: दिल्ली मुंबई अंतर 12 तासांनी कमी होणार, द्रुतगती मार्गाची 10 वैशिष्ट्ये

कोणत्या ठिकाणचा आहे व्हिडिओ?

क्रिकेटचा हा व्हिडिओ बेळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. बेळगावच्या डेपो मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेत एका सामन्यादरम्यान हा झेल पकडला गेला. श्री ट्रॉफीच्या सेमी फायनल मधील एस आर एस हिंदुस्थान विरुद्ध साईराज वॉरियर्स यांच्यात सामना सुरू होता. यावेळी बेळगावच्या किरण तरळेकर यांनी सीमारेषेजवळ गेलेला झेल अतिशय अप्रतिम पद्धतीने पकडला आहे.

Belgaum Viral catch
Nigeria : एटीएमसमोर रांगा, बँकेतील रोखड संपली...'या' देशात 'नोटाबंदी'मुळे लोकांचे बुरे हाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. किरण तरळेकर तू खरंच अफलातून कॅच घेतलास... तुझं अभिनंदन! क्रिकेटमध्ये तुला bright future आहे! लवकरच भेटू! असे ट्विट पवार यांनी केलं आहे.

किरण तरळेकर यांनी सीमारेषेजवळ जवळ घेतलेला हा झेल सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी किरण तरळेकरचे तोंड भरून कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com