नेपाळ विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू

खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
Nepal Airplane Missing
Nepal Airplane MissingDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळमध्ये 29 मे रोजी एक प्रवासी विमान बेपत्ता झाले होते. या विमानात चार भारतीय आणि तीन जपानी नागरिकांसह एकूण 22 प्रवासी होते. या विमानाने पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. नंतर त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. हे विमान पोखराहून जोमसोमला जात असता रविवारी मुस्तांग जिल्ह्यातील मानपाथी शिखराच्या पायथ्याशी 14,500 फूट उंचीवर कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर रविवारी सकाळी अपघातस्थळावरून 22 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले . तर आज 12 मृतदेह काठमांडूला आणण्यात येणार आहेत. ( 22 killed in Nepal plane crash)

रविवारी सकाळी 9.55 वाजता (NST) पोखरा येथून मुस्तांगमधील जोमसोमसाठी उड्डाण केलेल्या ट्विन-ऑटर विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच संपर्क तुटला आणि नंतर सोमवारी सकाळी मुस्तांगमधील थासांग ग्रामीण नगरपालिका-2 च्या सांसुरे क्लिफ येथे सापडला. लगेचच, हिमालयीन राष्ट्राच्या सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी एक पत्रकार निवेदन जारी करून या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. वरिष्ठ वैमानिक अभियंता रतीश चंद्र लाल सुमन हे नेतृत्व करतील.

Nepal Airplane Missing
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल

सोमवारी, 21 मृतदेह बाहेर काढल्यानंतर नेपाळी लष्कराने 10 मृतदेह बेस स्टेशनवर नेले. बचाव आणि शोध मोहिमेची देखरेख करणारे काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवक्ते टेकनाथ सिटुआला यांनी एएनआयला सांगितले की, “खबंगमधील एमआय-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने दहा मृतदेह बेस स्टेशनवर परत आणले जात आहेत. 50 - 60 बचावकर्ते तैनात असतानाही, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. अपघातस्थळावर तीन हेलिकॉप्टर देखील तैनात आहेत जे अपघातस्थळापासून जवळच्या बेस स्टेशनवर बचावकर्त्यांनी ठेवलेले मृतदेह बाहेर काढण्यात गुंतले आहेत.

नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने केलेल्या प्राथमिक तपासणीनंतर खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. सीएएएनचे महासंचालक प्रदीप अधिकारी म्हणाले, प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे, की ज्या विमानाने उजवे वळण घेतले पाहिजे होते. त्या विमानाने खराब हवामानामुळे डावीकडे वळण घेतले आणि ते क्रॅश झाले. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी अपघातात मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com