Recognise Palestinian State: इस्रायलला मोठा धक्का! स्पेनसह ‘या’ तीन देशांनी पॅलेस्टाईनला दिली मान्यता; इस्त्रायली मंत्री म्हणाले...

Norway, Ireland, Spain To Recognise Palestinian State: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं घनघोर युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Benjamin Netanyahu
Benjamin NetanyahuDainik Gomantak

Norway, Ireland, Spain To Recognise Palestinian State: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं घनघोर युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल आता राफाह शहरावर हवाई हल्ले करत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव झुगारुन इस्त्रायल गाझावर हल्ले करत आहे. यातच आता, इस्रायलला मोठा फटका बसला आहे. नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या तीन देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे.

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर म्हणाले की, ‘’टू-स्टेट सोल्यूशन काढणे हे इस्रायलच्या हिताचे आहे. याचा अर्थ इस्रायललाही एक देश म्हणून मान्यता मिळावी. तसेच, गाझा पट्टी आणि वेस्ट बँक मिळून पॅलेस्टाईन राष्ट्राला ओळखले जावे. टू-स्टेट सोल्यूशनने दोन्ही देशातील वाद संपुष्टात येईल आणि पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल.’’ नॉर्वेच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर आता स्पेन आणि आयर्लंडनेही असेच संकेत दिले आहेत.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: ‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

दरम्यान, 28 मे रोजी आम्ही पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता देऊ असे नॉर्वेचे पंतप्रधान म्हणाले. जर आपण पॅलेस्टाईनला मान्यता दिली नाही तर मध्यपूर्वेत शांतता नांदणार नाही, असेही ते म्हणाले. नॉर्वेच्या घोषणेनंतर लगेचच आयर्लंडचे पंतप्रधान सायमन हॅरिस म्हणाले की, त्यांचाही देश पॅलेस्टाईनला मान्यता देईल. मीडियाशी बोलताना हॅरिस म्हणाले की, ‘आज आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेनने पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.’

ते पुढे म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की जगातील आणखी काही देश या दोन्ही देशांना मान्यता देण्यासाठी पुढे येतील. पुढील काही आठवड्यांतच महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी बुधवारी सांगितले होते की, ‘आमच्या मंत्रिमंडळाची बैठक 28 मे रोजी होणार आहे. या दिवशी आम्ही पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचा ठराव मंजूर करु.’ दुसरीकडे, या देशांच्या भूमिकेवर इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, अशाप्रकारची भूमिका घेतल्यास राजनैतिक संबंध बिघडतील.

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

इस्रायलने ताबडतोब राजदूताला परत बोलावले

इस्रायलने आयर्लंड आणि नॉर्वे येथील राजदूतांना तातडीने परतण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने या तिन्ही देशांच्या निर्णयावर आक्षेप व्यक्त करत यामुळे अस्थिरता वाढेल, असे म्हटले आहे. हे पाऊल हमासच्या पंजात अडकल्यासारखे आहे, असेही इस्रायली मंत्री म्हणाले.

दरम्यान, इस्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासने गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com