Series of mysterious deaths of Putin opponents continues, the bodies of a former general and his wife have been found:
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना विरोध करणाऱ्या आणखी एका व्यक्तीचा रशियामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. माजी रशियन जनरल व्लादिमीर स्विरिडोव्ह नुकतेच पत्नीसह बेडवर मृतावस्थेत आढळले.
रशियाचे माजी जनरल व्लादिमीर स्वीरिडोव्ह यांनी हवाई दलाच्या प्रशिक्षणाबाबत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका केली होती, असे वृत्त न्यूजवीकने दिले आहे.
यूएस-आधारित न्यूजवीकने सरकारी वृत्तसंस्थेचा हवाला देत वृत्त दिले आहे की, 68 वर्षीय स्विरिडोव्ह यांचा मृतदेह एका अनोळखी महिलेसह सापडला आहे. परंतु दरम्यानच्या काळात रशियन आउटलेट्स बाझा आणि कॉमर्संटने नोंदवले की मृत महिला स्विरिडोव्ह यांची पत्नी होती.
या पती-पत्नीचे मृतदेह अँडझिव्हस्की गावात त्यांच्या घरात बेडवर एकत्र सापडले. स्विरिडोव्ह यांनी रशियाच्या 6 व्या हवाई लष्कर आणि हवाई संरक्षण दलाचे नेतृत्व केले आहे. 2007 मध्ये, स्विरिडोव्ह यांनी रशियन मासिक टेक ऑफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुतिन यांच्यावर टीका करत वैमानिकांच्या प्रशिक्षणाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या तयारीसाठी वैमानिकांना किमान 100 तासांचे प्रशिक्षण असले पाहिजे, परंतु त्यांच्या मते लष्कराचा सरासरी उड्डाण वेळ फक्त 25 ते 30 तासांचा होता.
तथापि, स्विरिडोव्हच्या मृत्यूमध्ये हिंसाचार झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. माजी रशियन जनरलच्या मृत्यूवर क्रेमलिनने आतापर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही.
पुतिन यांच्यावर टीका करणाऱ्याचा किंवा विरोधकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
अलीकडेच वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांचा एका कथित विमान अपघातात मृत्यू झाला. प्रीगोझिनने वॅगनरच्या सैन्याचा गैरवापर केल्याबद्दल रशियन सरकारवर टीका केली. यानंतर वॅग्नर चीफने नमध्ये रशियन नेतृत्वाविरुद्ध सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला होता.
यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये, भारतातील ओ़डिशामध्ये रायगडा येथे हॉटेलच्या खिडकीतून पडून दिग्गज रशियन व्यावसायिक पावेल अँटोनोव्ह यांचा मृत्यू झाला होता.
कीवमधील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर राजकारणी आणि लक्षाधीश पावेल अँटोनोव्ह यांनी पुतीन यांच्या युक्रेनसोबतच्या युद्धावर व्हॉट्सअॅपवर टीका केली होती, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय पुतीन यांचे असे किमान 1 डझन 'ज्ञात शत्रू' आहेत ज्यांचे रहस्यमयी मृत्यू झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.