United Nations: संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा केली पाकिस्तानची बोलती बंद; 'हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनलाय...'

United Nations: भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकिस्तानला जोरदार फटकारले.
United Nations
United Nations Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकिस्तानला जोरदार फटकारले. किंबहुना, जेव्हापासून पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे, तेव्हापासून भारतविरोधी वक्तव्ये वाढली आहेत. अशा परिस्थितीत तो भारताविरुद्ध गरळ ओकण्यासाठी प्रत्येक व्यासपीठाचा वापर करतो.

यावेळी भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची बोलती बंदी केली. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानने भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मीरमधील मुस्लिमांवर अत्याचार करण्यात येत असल्याचा आरोपही पाकिस्तानकडून करण्यात आला. यानंतर भारताने (India) त्याच व्यासपीठावर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्याची बोलती बंद केली.

United Nations
United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

भारत पाकिस्तानबद्दल काय म्हणाला

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायदेशीर सल्लागार काजल भट्ट यांनी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला फटकारले. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे सातत्याने उल्लंघन करणारा देश असल्याचे सांगत त्यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. काजल यांनी पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनल्याचेही सांगितले. त्यांनी पूर्व पाकिस्तानातील नरसंहाराच्या पाकिस्तानच्या लाजिरवाण्या इतिहासाकडे लक्ष वेधले, ज्यासाठी त्याने कधीही माफी मागितलेली नाही.

United Nations
United Nations: गाझामधील युद्ध थांबवले नाही तर... संयुक्त राष्ट्रात भारताने इस्रायल आणि हमासला सुनावले

दरम्यान, धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारामुळे पाकिस्तान (Pakistan) जगभरात कुप्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात अल्पसंख्याकांची संख्या सातत्याने कमी होत गेली. सध्या परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, पाकिस्तानच्या बहुसंख्य लोकसंख्येसमोर मोजकेच अल्पसंख्याक उरले आहेत. असे असूनही, पाकिस्तानी कट्टरतावादी अल्पसंख्याक हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांना सतत त्रास देतात. अल्पसंख्याकांवर धर्मांतरासाठी दबाव आणला जातो. त्यांच्या बहिणी आणि मुलींचे अपहरण केले जाते. पाकिस्तानी पोलिसही अल्पसंख्याकांचे ऐकत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com