United Nations: गाझामधील युद्ध थांबवले नाही तर... संयुक्त राष्ट्रात भारताने इस्रायल आणि हमासला सुनावले

Ruchira Kamboj: भारताने (India) संयुक्त राष्ट्रात गाझामधील मानवतावादी संकटाचा उघडपणे निषेध केला आहे.
Ruchira Kamboj
Ruchira KambojDainik Gomantak

Israel Hamas War: जगात एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे तर दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने भयंकर रुप धारण केले आहे. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे, हमासचा नायनाट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे.

इस्त्रायलने नुकताच गाझामधील राफाह शहरावर हल्ला केला. या हवाई हल्ल्यानंतर जगभरातून इस्त्रायलवर टीकेचे बाण सोडले गेले. परंतु इस्त्रायलला (Israel) काहीही फरक पडला नाही. इस्त्रायलची गाझामधील कारवाई निदंनीय असल्याचे आंतराष्ट्रीय स्तराववरुन सातत्याने म्हटले जात आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी इस्त्रायलच्या विरोधात अनेक प्रस्तावही आणले.

दरम्यान, भारताने (India) संयुक्त राष्ट्रात गाझामधील मानवतावादी संकटाचा उघडपणे निषेध केला आहे. विष्पाप नागरिकांचा मृत्यू कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही, असे भारताने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, ‘’हमास आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धात ज्या प्रकारे सामान्य लोक चिरडले जात आहेत, ते आगामी काळात मोठ्या संकटाचा इशारा देणारे आहे.’’

Ruchira Kamboj
Israel Hamas War: ‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 10व्या आपत्कालीन विशेष सत्राला संबोधित करताना कंबोज म्हणाल्या की, ‘’गाझामध्ये सात महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत एक मोठे मानवतावादी संकट निर्माण झाले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. आता हे संकट आणखी मोठे रुप करु शकते. अशा स्थितीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव क्रमांक 2728 स्वीकारुन एक सकारात्कम संदेश आपण देऊ शकतो.’’

कंबोज पुढे म्हणाल्या की, ‘’भारताने अनेक प्रसंगी युद्धाचा विरोध केला आहे. यापैकी एक म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्राण गेले. याशिवाय, लहान मुले आणि महिलांनाही जीव गमवावा लागला. जे मानवतावादी संकट उद्भवले आहे ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाऊ शकत नाही. प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवतावादी नियम आणि कायद्यांचे पालन केले पाहिजे.’’

Ruchira Kamboj
Israel-Hamas War: बेंजामिन यांची दडपशाही! अल-जझीराच्या कार्यालयांना टाळं ठोकण्याची घोषणा; हमाससाठी काम केल्याचा आरोप

गाझामधील मानवतावादी संकटाबद्दल बोलताना कंबोज म्हणाल्या की, ‘दहशतवाद आणि ओलीस ठेवण्याचे कोणतेही स्पष्टीकरण असू शकत नाही.’ त्या पुढे म्हणाल्या की, ‘’7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर ज्या प्रकारे हल्ला झाला तो अत्यंत धक्कादायक होता. भारत दीर्घकाळापासून दहशतवादाला विरोध करत आहे. ओलिसांना कोणत्याही अटीशिवाय तात्काळ सोडण्यात यावे.’’ द्विराज्य समाधानाबाबत कंबोज म्हणाल्या की, ‘’आमच्या सरकारने नेहमीच द्विराज्य समाधानावर भर दिला आहे. संवादातूनच हे साध्य होऊ शकते. त्यामुळे प्रदेशात शांतता प्रस्थापित होऊ शकते.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com