Senegal's Parliament Video: धक्कादायक! भर संसदेत गरोदर महिलेच्या पोटावर मारली लाथ

गर्भवती महिला खासदाराला टार्गेट करण्याची अशी घटना प्रथमच घडली आहे.
Senegal's Parliament Video
Senegal's Parliament Video

पश्चिम आफ्रिकेतील देश सेनेगलच्या संसदेत भीषण हिंसाचार झाला आहे. हिंसाचार एवढा वाढला की येथील खासदारांनी महिला खासदारांच्या पोटावर लाथ मारली. महिला खासदार गर्भवती असल्याने काहीकाळा ती बेशुद्ध झाली होती. हिंसाचार झाला तेव्हा संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. या वादाचे रुपांतर हाणामारीत कधी झाले ते कोणालाच कळले नाही. सहकाऱ्याच्या पोटावर लाथ मारणाऱ्या दोन खासदारांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. गर्भवती महिला खासदाराला टार्गेट करण्याची अशी घटना प्रथमच घडली आहे.

Senegal's Parliament Video
Mahadayi Water Dispute:...तर माझे नाव बदला; म्हादईवरून कर्नाटकच्या जलस्त्रोत मंत्र्याने दिले चॅलेंज

सेनेगलचे खासदार मामाडो नियांग आणि मसाता सांब यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या दोघांनी खासदार एमी नादिये यांच्या पोटावर लाथ मारली. एमीने एका धार्मिक नेत्यावर टिप्पणी केली होती. त्यामुळे दोन्ही खासदार चांगलेच संतापले. नियांग आणि साब यांना नादियाला $8,100 देण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.

Senegal's Parliament Video
Odisha: ओडिसात आणखी एका रशियन नागरिकाचा मृत्यू, 15 दिवसांत तिसरी घटना

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एक डिसेंबर रोजी सुरू असलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नादिया यांना थप्पड मारण्यात आली.त्याला प्रत्युत्तर म्हणून नद्या खुर्ची फेकतात. पण याचवेळी त्यांच्या पोटात लाथ मारली आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि बाकीचे खासदार त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, या घटनेनंतर ती संसदेतच बेशुद्ध पडली आणि तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com