ओडिसामध्ये आणखी एका रशियन नागरिकाचा मृतदेह सापडला आहे. जहाजावर क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या एका रशियन नागरिकाचा मृतदेह मंगळवारी ओडिशाच्या पारादीप बंदर परिसरात सापडला. गेल्या 15 दिवसांत ओडिशातील रशियन नागरिकाचा हा तिसरा मृत्यू आहे. अधिकार्यांना मृत व्यक्तीची ओळख पटली असून, सेर्गेई मिलियाकोव्ह असे त्याचे नाव आहे. सेर्गेईचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सर्गेई मिल्याकोव्ह एमव्ही अल्दानाह या जहाजावर क्रू मेंबर म्हणून काम करत होते. हे जहाज कोस्टल शिपिंगमध्ये भारतीय पोलाद कंपनीन कार्यान्वित केले आहे. पारादीप बंदरातून लोहखनिज भरण्यासाठी मंगळवारी रिकाम्या जहाजाचे बर्थिंग नियोजित होते. जहाज अद्याप बंदरावर पोहोचलेले नाही.
एका बंदर अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “बंदर आरोग्य अधिकाऱ्याने जहाजाला भेट दिली आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली. सुमारे 4 वाजता जहाजाच्या कॅप्टनने क्रू मेंबरच्या मृत्यूबद्दल बंदर अधिकाऱ्यांना संदेश पाठवण्यात आला. या जहाजात भारतीयांसह एकूण 23 क्रू मेंबर आहेत.
याआधी ओडिसातील एका हॉटेलमध्ये दोन रशियन नागरिकांचा गूढ मृत्यू झाला होता. हॉटेलमध्ये मरण पावलेल्या दोन रशियन नागरिकांची ओळख पावेल अँटोनोव्ह आणि व्लादिमीर बिदेनोव्ह अशी झाली आहे. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून कथितरित्या पडल्यानंतर 24 डिसेंबर रोजी अँटोनोव्हचा मृत्यू झाला तर 22 डिसेंबर रोजी बिडेनोव्ह त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.