वैद्यकीय क्षेत्रात सर्वात मोठा धमाका! शास्त्रज्ञांनी शोधली मानवी शरीराची 'ती' सुप्त शक्ती; अवयव गमावलेल्या रुग्णांना मिळणार नवजीवन

Human Organ Regeneration Scientific Breakthrough: शास्त्रज्ञांनी असा एक अद्भूत शोध लावला, जो येणाऱ्या काळात मानवाला आपले गमावलेले अवयव पुन्हा मिळवून देण्याची ताकद देऊ शकतो.
Human Organ Regeneration Scientific Breakthrough
Human Organ Regeneration Scientific BreakthroughDainik Gomantak
Published on
Updated on

Human Organ Regeneration Scientific Breakthrough: जर अपघातात एखाद्याला हात किंवा पाय गमवावा लागला, तर तो सरड्याच्या शेपटीसारखा काही दिवसांत पुन्हा नैसर्गिकरित्या येईल का? हे ऐकायला जरी एखाद्या कल्पनेसारखे किंवा निसर्गाच्या नियमांविरुद्ध वाटत असले, तरी शास्त्रज्ञांनी आता हे प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक अत्यंत मोठे पाऊल उचलले. आतापर्यंत जी गोष्ट पूर्णपणे अशक्य मानली जात होती, ती अमेरिकेच्या टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी खरी करुन दाखवली. शास्त्रज्ञांनी (Scientists) असा एक अद्भूत शोध लावला, जो येणाऱ्या काळात मानवाला आपले गमावलेले अवयव पुन्हा मिळवून देण्याची ताकद देऊ शकतो.

नेचर कम्युनिकेशन्स मासिकात प्रसिद्ध झालेल्या या नवीन संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी कोणत्याही बाह्य स्टेम सेल किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर न करता, केवळ दोन नैसर्गिक प्रथिनांच्या मदतीने उंदरांची कापलेली बोटे पुन्हा आणण्यात यश मिळवले. या प्रक्रियेमुळे गंभीररीत्या खराब झालेली हाडे, सांधे आणि लिगामेंट्स पूर्णपणे बरे केले जाऊ शकतील. या संशोधनाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किंवा गंभीर दुखापतीनंतर शरीरावर राहणारे मोठे आणि विद्रूप डाग या तंत्रज्ञानामुळे कायमचे नष्ट केले जाऊ शकतात.

Human Organ Regeneration Scientific Breakthrough
America: अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या 30 भारतीय ट्रक ड्रायव्हर्संना अटक; 'ऑपरेशन चेकमेट' अंतर्गत होणार हकालपट्टी

आतापर्यंत वैज्ञानिक जगतात कापलेले अवयव पुन्हा कार्यरत करण्यासाठी कृत्रिम प्लॅस्टिक आणि मेटलच्या अवयवांवर किंवा बाह्य स्टेम सेल्सवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु, या ताज्या शोधामुळे हे सिद्ध झाले की, मानवी शरीराकडे स्वतःला पूर्णपणे बरे करण्याची आणि अवयवांची पुनर्निर्मिती करण्याची नैसर्गिक क्षमता आधीपासूनच आहे, फक्त तिला योग्य उद्दीपनाची गरज असते. वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या या शोधामुळे भविष्यात मानवी अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com