World's Most Expensive Home: सौदी प्रिन्सचा आलिशान राजवाडा, 'एवढ्या किमतीत लोक...'

Saudi Prince Mohammed Bin Salman: सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.
Saudi Prince Mohammed Bin Salman
Saudi Prince Mohammed Bin Salman Dainik Gomantak

World's Most Expensive House: सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचीही भेट घेणार आहेत. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अतिशय आलिशान जीवन जगत असून ते फ्रान्समधील जगातील सर्वात महागड्या घरात राहत आहेत. पॅरिसमध्ये असलेले हे घर सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी 2015 मध्ये खरेदी केले होते.

दरम्यान, जगातील सर्वात महागडे घर, Chateau Louis XIV हे पॅरिस शहराच्या बाहेरील भागात आहे. हे व्हर्साय पॅलेससारखे बांधण्यात आले आहे. जे एकेकाळी फ्रेंच राजघराण्याशी संबंधित होते. सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Saudi Prince Mohammed Bin Salman) यांनी हे घर 2015 मध्ये $300 मिलियन म्हणजेच सुमारे 23 अब्ज 88 कोटी 93 लाख रुपयांना खरेदी केले होते. असे मानले जाते की, हे घर जगातील सर्वात महागडे आहे.

Saudi Prince Mohammed Bin Salman
US-China Conflict: तैवान मुद्द्यावर ड्रॅगन-अमेरिका पुन्हा आमने-सामने

या लक्झरी सुविधा सर्वात महागड्या घरात आहेत

सीबीएस न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांचे घर 7 हजार स्क्वेअर मीटरमध्ये बांधले गेले आहे. पॅरिसमधील (Paris) सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या या घराची किंमत इतकी आहे की, लाखो लोक अनेक दिवस दोन वेळचे जेवन करु शकतात. फ्रान्समध्ये (France) वसलेल्या या घरामध्ये नाईट क्लब, सोन्याचे पानांचे कारंजे, एक सिनेमागृह, तसेच खंदकात पाण्याखालील काचेचे कक्ष आहे, जे एखाद्या महाकाय मत्स्यालयासारखे दिसते. हे घर 2009 मध्ये 19 व्या शतकातील राजवाडा पाडून बांधण्यात आले होते.

पत्रकार खगोशी यांचा असा संबंध आहे

जगातील सर्वात महागड्या घराचे मालक असलेले सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांचे घर दिवंगत पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या भावाने बांधले आहे. इमाद खशोग्गी फ्रान्समध्ये लक्झरी प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालवतात.

Saudi Prince Mohammed Bin Salman
अमेरिका चीन आमने-सामने: तैवान, कोरोना, तिबेट मुद्द्यावर अधिकाऱ्यांची बैठक

खगोशी यांच्या हत्येनंतर सौदी प्रिन्सवर आरोप

2018 मध्ये पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येनंतर सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांचेही नाव आरोपी म्हणून समोर आले होते. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानुसार जमाल खशोग्गी यांना फाशी देण्यात आल्याचे आरोप झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com