Israel-Hamas Ceasefire Updates: 21 वर्षांपासून इस्रायली तुरुंगात असणारा बरघौती होणार पॅलेस्टाईनचा नवा राष्ट्राध्यक्ष? हमास सुटकेवर ठाम

Israel-Hamas Ceasefire Updates: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Marwan Barghouti
Marwan Barghouti Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas Ceasefire Updates: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. भीषण युद्धादरम्यान, रमजानपूर्वी इस्त्रायल आणि हमास यांच्यात चार आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता आहे. युद्धविरामासंबंधी अमेरिकेचा दावा असूनही या कराराचे फायदे फारच कमी दिसत आहेत. कारण इस्रायल आणि हमास त्यांच्या मागण्या एकमेकांवर लादत आहेत. इस्रायलने गाझा शहरावरील हल्ले पूर्णपणे थांबवावेत आणि कैद झालेल्या पॅलेस्टिनींची सुटका करावी, यावर हमास ठाम आहे. हमासने फतह चळवळीचा प्रमुख नेता मारवान अल-बरघौतीच्या सुटकेसाठी लॉबिंग सुरु केले आहे, जो पॅलेस्टाईनचा पुढचा अध्यक्ष असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, हमाससोबत युद्धविरामाबाबत सुरु असलेल्या चर्चेत इस्रायलने गाझा शहरावरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू सतत आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करत आहेत की, जोपर्यंत हमासचा खात्मा होत नाही तोपर्यंत युद्ध संपणार नाही. गाझा शहरात इस्रायली सैनिकांचे हत्याकांड सुरुच आहे. एकट्या गाझा शहरातून या युद्धात किमान 30 हजार लोक मारले गेले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे.

Marwan Barghouti
Israel-Hamas War: ''त्यांना नग्न केले, झोपू दिले गेले नाही...''; इस्रायलच्या बंदिवासातून सुटलेल्या पॅलेस्टिनींनी सांगितली आपबीती

हमास बारघौतीच्या सुटकेवर ठाम!

दुसरीकडे, अमेरिका आणि कतारच्या माध्यमातून हमास आणि इस्रायलमध्ये रमजानपूर्वी युद्धविरामाबाबत चर्चा सुरु आहे. इस्त्रायली नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल या संभाव्यतेने फतह चळवळीचा नेता मारवान अल-बरघौती चर्चेत आला आहे. बीबीसी उर्दूच्या रिपोर्टनुसार, अलीकडच्या काही दिवसांत पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे संभाव्य नवे अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे. हमासचे म्हणणे आहे की, कैदी आणि ओलीस यांच्या देवाणघेवाणीच्या कोणत्याही नवीन करारानुसार, त्यांना कोणत्याही किंमतीत सोडले पाहिजे.

हमासचा लीडर ओसामा हमदानने बीबीसी अरेबिकला सांगितले की, 'आम्ही एक चळवळ म्हणून स्पष्ट भूमिका घेतली आहे, ज्याच्या पाठीशी आम्ही अजूनही उभे आहोत. इस्रायली तुरुंगात बंदिस्त असलेल्या सर्व पॅलेस्टिनी कैदी आणि बंदिवानांना कोणत्याही अटीशिवाय सोडण्यात यावे. ओसामा हमदाने पुढे सांगितले की, 'पॅलेस्टाईनसाठी बलिदान दिलेल्या कैद्याला समान वागणूक मिळावी हे आम्ही राष्ट्रीय मिशन मानतो.' ऑपरेशन वफा-उल-अहरारमध्येही आम्ही असेच केले. दुसरीकडे, हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2006 च्या इस्रायली लष्करी गिलाद शालित आणि पॅलेस्टिनी कैदी देवाणघेवाणीच्या ऑपरेशनसाठी हमास ''वाफा अल-अहरार'' नावाचा वापर करते.

Marwan Barghouti
Israel-Hamas Deal: रमजानपूर्वी गाझावासीयांसाठी मिळणार आनंदाची बातमी? इस्रायल आणि हमास यांच्यात होणार मोठा करार

बारघौती कोण आहे?

इस्रायली वृत्तपत्र मारिवच्या मते, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये इस्रायली तुरुंग प्रशासनाला अशी माहिती मिळाली होती की मारवान अल-बरघौती विविध माध्यमातून पश्चिम जॉर्डनमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतर इस्रायलने त्याला एकांतात ठेवले. मारवान अल-बरघौतीने वयाच्या 15व्या वर्षी फतह चळवळीत सामील होऊन राजकीय हालचाली सुरु केल्या. यासर अराफत हे तेव्हा फतह चळवळीचे प्रमुख होते. जसजशी त्याची राजकीय कारकीर्द वाढत गेली तसतसे त्याने पॅलेस्टिनींच्या हक्कांसाठी उठवायला चालू केले.

Marwan Barghouti
Israel-Hamas War: क्रूरता! 25 हजार पॅलेस्टिनी महिला आणि मुले युद्धात मारली गेली; अमेरिकेने दिली मोठी अपडेट

दुसरीकडे, 2002 मध्ये त्याने अमेरिकन वृत्तपत्र "वॉशिंग्टन पोस्ट" मध्ये लिहिले होते की, "मी आणि फतह चळवळ इस्रायलमधील नागरिकांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आहोत. पण मला स्वतःचा बचाव करण्याचा, माझ्या मातृभूमीवर इस्रायली कब्जाला विरोध करण्याचा आणि माझ्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा अधिकार आहे.'' बीबीसी अरेबिकने वृत्त दिले आहे की, 2002 पासून इस्रायली तुरुंगात असलेला अल-बरघौती हा हमास आणि इस्रायल यांच्यात करार झाल्यास पॅलेस्टिनी प्राधिकरणाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी आणि पुढील सरकार स्थापन करण्यासाठी हमासची पहिली पसंती असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com