Pakistan News: सौदी अरेबियाने पाकिस्तानला अचानक मोठा धक्का दिला आहे. हे प्रकरण मुस्लिमांच्या श्रद्धेशी संबंधित आहे. सौदी अरेबियाने हज यात्रा करणाऱ्या पाकिस्तानी कंपन्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी पाकिस्तानची इच्छा होती पण सौदी अरेबियाने स्पष्टपणे नकार दिला. सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार मंत्री अनिक अहमद यांनी सोमवारी एका सिनेट पॅनेलला सांगितले की, मंत्रालयाने हज यात्रेबाबत एक नवीन धोरण तयार केले आहे, ज्यामध्ये हजसाठी कमी कालावधीचा समावेश करण्यात आला आहे.
सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) निर्णयाबाबत चर्चा करताना अनिक अहमद म्हणाले की, सौदी सरकारने पाकिस्तानातील केवळ 46 कंपन्यांना हज यात्रा करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सौदी अरेबियाच्या या निर्णयावर पाकिस्तान फार काही करु शकत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तानातील 905 कंपन्या हज ऑपरेशनमध्ये गुंतल्या होत्या. आता फक्त 46 कंपन्या हज करु शकणार आहेत. पाकिस्तान हज कमिटीचे सदस्य मौलाना फैज मुहम्मद यांनी सुचवले की, ''नवीन योजना पुढील वर्षापासून लागू करावी. आम्हाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांशी बोलून समस्या सोडवावी लागेल".
मंत्री पुढे म्हणाले की, त्यांनी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांना निर्णयावर विचार करण्यास सांगितले होते, परंतु सौदी सरकारने असमर्थता दाखवली. या वर्षी, 81,000 हून अधिक पाकिस्तानी यात्रेकरुंनी सरकारी योजनेंतर्गत हजयात्रा केली, तर उर्वरित 179,210 च्या एकूण कोट्याने खाजगी टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून यात्रा केली.
सरकारी कार्यक्रमांतर्गत हजला जाणार्या पाकिस्तानी यात्रेकरुंना 40 दिवस किंगडममध्ये राहावे लागते.
अनिक अहमद यांनी सांगितले की, "मंत्रालय, सौदी सरकारच्या सहकार्याने, हजसाठी कमी कालावधी लागू करण्याची योजना आखत आहे."
हज 2024 च्या व्यवस्थेबद्दल समितीला माहिती देताना अहमद म्हणाले की, मंत्रालय क्यूआर कोडसह सूटकेस आणि महिलांसाठी खास डिझाइन केलेले स्कार्फ सादर करेल, जेणेकरुन पाकिस्तानातून (Pakistan) येणाऱ्या यात्रेकरुंना सहज ओळखता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.