Pakistan: पाक जनतेचं भविष्य अंधारमय, जागतिक बँकेच्या धक्कादायक अहवालाने...

Pakistan News: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे.
Pakistan
PakistanDainik Gomantak

Pakistan News: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच आता, IMF च्या कर्जाने पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत.

अनेक देशांकडून कर्ज घेऊनही पाकिस्तानची अवस्था दयनीय आहे. आता जागतिक बँकेच्या एका धक्कादायक अहवालाने पाकिस्तानी जनतेला आणखी संकटात टाकले आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार पाकिस्तानातील गरिबीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. पाकिस्तानातील गरिबी 39.4 टक्क्यांवर पोहोचली आहे.

दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानातील (Pakistan) गरिबी 39.4 टक्क्यांवर पोहोचल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. खराब आर्थिक परिस्थितीमुळे 1.25 कोटींहून अधिक लोक याला बळी पडले असून, देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील.

Pakistan
Russia-Pakistan: अखेर पाकिस्तानने रंग दाखवला! डॉलरच्या लालसेपोटी दिला चीन-रशियाला धोका

जागतिक बँकेच्या (World Bank) मते, एका वर्षात पाकिस्तानमधील गरिबी 34.2 टक्क्यांवरुन 39.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. यासह 1.25 कोटीहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली पोहोचले आहेत. पाकिस्तानमध्ये, प्रतिदिन US$3.65 च्या उत्पन्नाची पातळी दारिद्र्यरेषा मानली जाते.

Pakistan
Pakistan PM: 'भारतानं काश्मीरला जगातील सर्वात मोठं जेल बनवलं...' 'पाक' च्या काळजीवाहू पंतप्रधानांनी ओकली गरळ

मसुदा धोरणात म्हटले आहे की, सुमारे 95 दशलक्ष पाकिस्तानी आता गरिबीत जगत आहेत. पाकिस्तानचे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ टोबियास हक म्हणाले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल आता गरिबी कमी करत नाही आणि इतर देशांच्या तुलनेत येथील जीवनमान घसरत आहे.

जागतिक बँकेने शेती आणि रिअल इस्टेटवर कर लादण्याचे आणि फालतू खर्च कमी करण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com